Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रमुख्याध्यापिका मोहिनी नरसिंग कावळे यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार

मुख्याध्यापिका मोहिनी नरसिंग कावळे यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार

मुंबई : सायन येथील महानगरपालिकेच्या एफ/उत्तर विभागातील जोगळेकरवाडी मनपा हिंदी शाळा क्र. 2 च्या मुख्याध्यापिका यांना २०२३-२०२४ चा बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वोच्च सम्मान आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार बृहन्मुंबई महानगर पालिका अति. आयुक्त अमित सैनी सर, उपायुक्त (शिक्षण)प्राची जांभेकर मॅडम व मनपा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक )सुजाता खरे मॅडम मनपा सर्व

उपशिक्षणाधिकारी,मुखतार शाह (उपशिक्षणाधिकारी लोकसभा कक्ष) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मोहिनी नरसिंग कावळे मनपा सेवेत उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून जोगळेकरवाडी मनपा शाळेतील तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत.शिक्षकांचे मार्गदर्शन पालक सहभाग, विद्यार्थी स्पर्धा परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट मध्ये यावे म्हणून सतत प्रयत्नशील, पटसंख्या वाढी साठी प्रयत्न विद्यार्थी गुणवत्ता वाढी साठी सतत उपक्रम राबवतात. अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांशी त्यांची नाळ जुळलेली असून,त्यांचे कार्य गौरवास्पद आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांना 2023-24 या शैक्षणिक वर्षात आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
फ-उत्तर विभागातील प्रशासकीय अधिकारी (शाळा) श्री किसन पावडे सर,कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी, प्रभारी विभाग निरीक्षिका पूजा पाटील तसेच कय्युम तडवी, जोगळेकरवाडी हिंदी शाळा क्रमांक 1 च्या मुख्याध्यापिका नीलम पांडे, हिंदी, मराठी सर्व भाषिक मुख्याध्यापक तसेच शाळेतील वरिष्ठ शिक्षक शोभा,श्वेता, विनय शुक्ला प्रदीप पाटील, जितेंद्र दमाहे,संदिप पाटील श्रीकृष्णा केंद्रे, सपना, वैशाली, प्रीति, निर्मला, अंजू, सुवर्णा व इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments