Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रजिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि मतदार नोंदणी...

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक संपन्न

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी उपस्थितांना सूचित केले की, राजकीय पक्षांनी त्यांच्या बूथ लेवल एजंटची नियुक्ती लवकरात लवकर करावी व त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी ब्लॉक लेवल ऑफिसर्सची नेमणूक योग्य कालावधीत करावी व त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. तसेच यादीभाग नकाशे तपासून घ्यावेत. मयत मतदारांची नावे कोणत्याही परिस्थितीत मतदारयादीत असणे अपेक्षित नाही. त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेऊन मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही तातडीने करावी. तसेच दुबार मतदारांची खात्री करून दुबार नावे नसतील, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.

या बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, 134 भिवंडी ग्रामीण (अ.ज.) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी मल्लिकार्जून माने, 136 भिवंडी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी उदय किसवे, 137 भिवंडी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी अमित सानप, 138 कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी रोहितकुमार राजपूत, 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती अंजली पवार, 140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी प्रशांत जोशी, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील निवासी नायब तहसिलदार प्रशांत कुमावत, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवासी नायब तहसिलदार नेहा तांबडे, 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी अमित शेडगे, 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश जंगले, 145 मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सुनील भुताळे, 146 माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी इब्राहिम चौधरी, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश पाटील, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी उर्मिला पाटील, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल इनामदार, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सुचिता भिकाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी सुर्वे-पाटील, तहसिलदार उज्वला भगत, तहसिलदार प्रदीप कुडाळ, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments