Wednesday, July 30, 2025
घरमनोरंजनठाण्यात 22 ते 31 मार्च लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिर

ठाण्यात 22 ते 31 मार्च लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिर

प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि ठाण्यातील महाराष्ट्र कला संस्कृती मंच या सांस्कृतिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 ते 31 मार्च या कालावधीत ठाण्यात लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे या शिबिरात सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि तरुण-तरुणी यांना विनाशुल्क प्रवेश दिला जाणार आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मराठा मंडळ सभागृह पाचपखाडी येथे शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिबिर संचालिका शैला खांडगे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे
या शिबिरात केवळ पारंपरिक लावण्या यांचे प्रशिक्षण दिले जाईल गण मुजरा गवळणी छक्कड यांचे प्रशिक्षण दिले जाईल महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक कार्यमंत्री एडवोकेट आशिष शेलार तसेच या विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात प्रयोगात्मकलांची विविध शिबिरे आयोजित केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात शिबिराचे आयोजन होत आहे या शिबिरात लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर सिनेतारका मेधा घाडगे डॉक्टर सुखदा खांडगे तेजश्री सावंत ज्ञानेश्वर ढोरे सुभाष खरोटे आदी मंडळी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणार आहेत अधिक माहितीसाठी ,9987333893 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments