Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रसुहीत जीवन ट्रस्ट पेन संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षक...

सुहीत जीवन ट्रस्ट पेन संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन

प्रतिनिधी : स्पेशल ऑलिम्पिक भारत, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षा डॉ. सौ. मेधा सोमय्या मॅडम, एरिया डायरेक्टर डॉ. भगवान तलवारे, मा. स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ. जितेंद्र ढोले, ई. एस. पी. एन., स्पेशल ऑलिंपिक भारत, महाराष्ट्र रायगड तसेच सुहित जीवन ट्रस्ट, पेण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा व क्रिडा प्रशिक्षक प्रशिक्षण यांचे आयोजन सोमवार, दिनांक १७ व मंगळवार, दिनांक १८ मार्च २०२५ रोजी करण्यात आलेले आहे होते.

सदर कार्यक्रमास समाजातील विविध स्तरांवरील मान्यवर व्यक्ती सहभागी झाले होते. तसेच रायगड, मुंबई, पुणे, नवी मुंबई या जिल्ह्यांमधील बौद्धिक अक्षम विद्यार्थी, यूनिफाईड पार्टनर्स, तज्ञ कोचेस तसेच स्वयंसेवक हे देखील खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.
सुहित जीवन ट्रस्टचा बौद्धिक अक्षम मुलांना अक्षमतेकडून सक्षमतेकडे नेण्याच्या संकल्प सिद्धीचा जो प्रयत्न आपण करीत आहात तो निश्चितच कौतुकास्पद व वाखाणण्याजोगा आहे. या कार्यक्रमासाठी अनेकांनी शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिलेल्या आहेत.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments