Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रडाकेवाडी प्रिमीयर लीग मध्ये पूर्वा स्ट्राईकर्स विजेता तर स्पंदन सांची सुपरस्टार उपविजेता...

डाकेवाडी प्रिमीयर लीग मध्ये पूर्वा स्ट्राईकर्स विजेता तर स्पंदन सांची सुपरस्टार उपविजेता संघ

तळमावले : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे पार पडलेल्या दोन दिवसीय डाकेवाडी प्रिमीयर लीग पर्व 3 मध्ये पूर्वा स्ट्राईकर्स संघ विजेता, स्पंदन-सांची सुपरस्टार संघ उपविजेता तर त्रिमुर्ती फायटर्स संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरला. प्रथम क्रमांकासाठी रु.वीस हजार व चषक, व्दितीय क्रमांकासाठी रु.पंधरा हजार व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी रु.दहा हजार आणि चषक मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना संघांना प्रदान करण्यात आले.
या प्रीमियर लीगमध्ये राजवीर किंगमेकर 11-(संघमालक, शिवाजी डाकवे), पुर्वा स्ट्राईकर्स (संघमालक, रमेश जाधव), त्रिमुर्ती फायटर्स (संघमालक, कृष्णा चिंचुलकर), साल्वी फायटर्स (संघमालक, रविंद्र डाकवे), आरोही फायटर्स (संघमालक, शरद डाकवे), स्पंदन-सांची सुपरस्टार (संघमालक, डाॅ.संदीप डाकवे) हे सहा संघ सहभागी झाले होते.
या डाकेवाडी प्रिमीयर लिगच्या तिसऱ्या पर्वात 202 धावा आणि 4 बळी घेणारा प्रमोद डाकवे मिस्टर डिपीएल आणि बेस्ट बॅटर, सर्वाधिक 9 विकेट घेणारा नितीन डाकवे बेस्ट बाॅलर, 25 षटकार मारणारा अमित मस्कर सिक्सर किंग, सुंदर क्षेत्ररक्षण करणारा कृष्णा डाकवे तर उत्कृष्ट झेल घेतल्याबद्दल शंकर निस्कुळ याला बेस्ट कॅचर या सन्मानाने रोख रक्कम, बॅट, शुज, सन्मानचिन्ह, आणि क्रिकेट कीट देवून सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, प्रथम पारितोषिक रु.वीस हजार देणारे युवा उद्योजक ह.भ.प.अविनाश डाकवे (शेठ), व्दितीय पारितोषिक रु. पंधरा हजार देणारे युवा उद्योजक ज्ञानेश्वर डाकवे (शेठ), तृतीय पारितोषिक रु.दहा हजार देणारे अभिजीत डाकवे व विक्रम डाकवे, सर्व सामन्यांत चषक देणारे कृष्णा डाकवे व जीवन डाकवे, युटयूब लाईव्हसाठी युवा उद्योजक विकास जाधव, शिवाजी मस्कर, मैदान व्यवस्थेसाठी साठी संजय डाकवे, मंडपसाठी प्रमोद भाई पुणेकर, सत्कार साठी आनंदा डाकवे, स्कोरर साठी युवा उद्योजक शिवाजी डाकवे (शेठ), उत्कृष्ट फलंदाज बॅट साठी आनंद डाकवे, उत्कृष्ट गोलंदाज शुज आणि कीट साठी संदीप पवार, चेंडू साठी विमा सल्लागार दिनेश डाकवे, सामनावीर टी शर्ट साठी विठ्ठल डाकवे, सन्मानचिन्ह साठी अयांश डाकवे, मेडल साठी कृष्णा डाकवे, बुके व प्रथमोपचार पेटी साठी सुनील चव्हाण, फटाके साठी अधिक डाकवे, मॅन ऑफ द मॅच साठी दत्तात्रय पापळ, स्टंप साठी वैभवी विशाल डाकवे, पाणी साठी त्रिमुर्ती उद्योग समुहाचे राहूल डाकवे व अंकुश डाकवे, शिवाजी मस्कर व अन्य यांनी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा शिवरायांची मुर्ती शाल देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
त्रिमुर्ती 11 डाकेवाडी यांनी आयोजित केलेल्या डाकेवाडी प्रिमीयर लिग पर्व-3 यशस्वी करण्यासाठी युवा नेते अनिल डाकवे, युवा नेते तुकाराम डाकवे, उद्योजक नामदेव डाकवे (शेठ), डाॅ.संदीप डाकवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री संचालक आनंद डाकवे, विशाल डाकवे, शिवाजी डाकवे, कृष्णा डाकवे, विकास डाकवे, विकास जाधव, शरद डाकवे, रविंद्र डाकवे, अमोल मस्कर, दिनेश डाकवे, अमित मस्कर तसेच सर्वश्री सदस्य प्रमोद डाकवे, नितीन डाकवे, नवनाथ जाधव, अधिक डाकवे, रमेश जाधव, रविंद्र डाकवे, कृष्णा चिंचुलकर, पंकज डाकवे, प्रदीप डाकवे, ज्ञानेश्वर डाकवे, दिलीप डाकवे व अन्य यांनी संपूर्ण डाकेवाडी प्रिमीयर लिग यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments