Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रवाठार पेट्रोलपंप सशस्त्र दरोडयातील आरोपी अटकेत 10 मार्च रात्री 12 :00...

वाठार पेट्रोलपंप सशस्त्र दरोडयातील आरोपी अटकेत 10 मार्च रात्री 12 :00 वाजता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटली होती रक्कम

कराड(प्रताप भणगे) : कराड शहर जवळच वाठार या ठिकाणी दहा मार्च रोजी रात्री 12 च्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या दोन युवकांनी कोयत्याने वार करत पंपावर काम करत असलेल्या कामगारांच्या गळ्यातील पैशाची कातडी बॅग हिसकावून घेऊन पलायन केले होते या बाबत दाखल तक्रारीनुसार तालुका
पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेत गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्या यात एकूण घटनेत या कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
झाला

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने तपास करण्याचा सूचना दिल्या होत्या त्या अनुषणगाने कराड तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी महेंद्र जगताप यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडुकर मॅडम व विभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालूका पोलीस ठाण्याच्या दोन
स्थानिक गुन्हे शाखेची एक अश्या तीन टीम तयार करून आरोपींच्या मागावर लावल्या.

Cctv फुटेज आणि टेक्निकल आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने एका संशयितांची ओळख पटली तो लोकेशन बदलत होता तपास पथक त्याच्या मागावर असताना सांगली येथील रोहित उर्फ सुदाम कदम त्यास पकडण्यात
पथकाला यश आले त्याचा कडे कसून तपास केला असता त्याने सदर गुन्हा त्यानेच केल्याची कबुली दिली
त्याच्या सोबत दुचाकी चालविणाऱ्या मुलास आगाशिवनगर (मलकापूर) येथून ताब्यात घेतले असता तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले
या प्रकरणात प्राप्त आरोपी दादया कदम कडे कसून तपास केला असता या संपूर्ण घटनेचा मास्टरमाईंड हा कराड आटके येथील किशोर चव्हाण
हा असून त्याने त्याच्या गावातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या परशुराम दुपटे याच्याशी संगनमत करून
सदर चोरीचा प्लॅन आखला होता असे समोर आले
कराड तालुका पोलीस डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी
सदर गुन्ह्यात चोरीला गेलेली रक्कम , या कामी वापरलेले मोबाईल, दुचाकी असा ऐवज आरोपींकडून हस्तगत केला
या जबरी चोरी प्रकरणात मुख्य मास्टरमाइंड किशोर चव्हाण रा. अटके, पेट्रोल पंपावरील सामील कर्मचारी परशुराम दुपटे,सांगली येथील प्रत्यक्षात चोरी करणारा
दादया कदम व एक अल्पवयीन अश्या चौघांना या घटनेत अटक केली
अश्या प्रकारे कराड तालुका पोलीस ठाण्याचे पो नि महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे स पो नी सखाराम बिराजदार यांनी आरोपीचा चार जिल्ह्यात पाठलाग करत अखेर 15 रोजी
या संशयितांच्या मुसक्या आवळल्या
या तपासात
पोलीस उप निरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, पोलीस नाईक विनोद माने, किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव, यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली काम केले
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडुकर मॅडम विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी गुन्हा उघड करणाऱ्या
पथकाचे आणि अभिनंदन केले

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments