पांचगणी : दाभेमोहन गावच्या सुपुत्राने इटलीत एक आदर्श युवा उद्योजक म्हणून नाव कमावले आणि त्याने आपल्या जन्मभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या कार्याचा चंदनासारखा सुगंध गावापुरता मर्यादित न राहता तो सर्वदूर पोहोचावा असे गौरवोद्गार माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी केले.
दाभेमोहन (तालुका महाबळेश्वर ) येथे फिल्टरद्वारे १०० टक्के जलशुद्धीकरण करून गावाला देणारी श्री केदारेश्वर महाकाली जलसंजीवनी योजना ही जिल्ह्यातील पहिली.योजना , इटलीचे उद्योजक चंदन चव्हाण यांनी गावात सर्वत्र स्वखर्चाने बसविलेल्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा व नवीन कामांचा शुभारंभ कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी श्री गायकवाड बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, गटविकास अधिकारी यशवंत भांड , कोयनेचे अध्यक्ष किसनदादा जाधव , डी के जाधव, बी. व्हि. शेलार, सुनील पार्टे, सुभाष सोंडकर , उद्योजक चंदन चव्हाण , श्रीमती सुनीता चव्हाण, सचिन उतेकर, लक्ष्मण जाधव, दाभेमोहन परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
इटलीतील उद्योजक चंदन चव्हाण यांनी सौर ऊर्जा, पाण्यासाठी योजना, शाळेतील मुलांना मदत, शासकीय योजनेसाठी १० टक्के रक्कम, शेतकऱ्यांना मोफत ट्रॅक्टर अशा विविध समाजोपयोगी कामातुन आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या कार्याचा सुगंध फक्त दाभेमोहन गावापुरता मर्यादित न राहता तो १०५ गावांमध्ये पोहोचावा अशी आशा ही यावेळी संजूबाबा गायकवाड यांनी व्यक्त केली.
राजेंद्र शेठ राजपुरे यावेळी म्हणाले आपल्या मातीतील एक उद्योजक परदेशात जाऊन मोठा होतो पण जन्मभूमीला न विसरता आपल्या गावाची नव्हे तर समाजाची उभारणी करण्यासाठी मेहनत घेत असेल तर त्यांच्या पाठीवर थाप मारणे हे आपले कर्तव्य आहे. चंदन चव्हाण यांचे कार्य इतरांना प्रेरणादाई असल्याचे यावेळी सांगितले.
दाभेमोहन ग्रामस्थ व युवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश शिंदे यांनी केले तर विठ्ठल चव्हाण आभार मानले.
चौकट : दाभेमोहन गावचे सुपुत्र चंदन चव्हाण यांच्या समाजसेवी कीर्तिने उर भरून आल्याने अख्या गावाने त्यांना आज अक्षरशः डोक्यावर घेतले. गावाला शुद्ध फिल्टर पाणी, गावकऱ्यांसाठी आधुनिक शेतीसाठी मोफत ट्रॅक्टर, शालेय मुलांसाठी मदत, सौर ऊर्जा दिवे, गावातील वयस्कर लोकांना दत्तक घेणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, मोबाईल अँब्युलन्स अशा विविध योजना स्वकर्तृत्व व स्वखर्चाने आपल्या गावकऱ्यांसाठी राबवून आगळे वेगळे काम केले आहे. त्यांचा गावाने भव्य असा सन्मान केला.
२) चंदन चव्हाण यांनी दाभेमोहन गावाला ४० सौर दिवे दिले आहेत पण त्यांनी आता दुर्गम अशा १०५ गावांना सौर दिवे देऊन ही सर्व गावे प्रकाशमान करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
३) १०५ गावांसाठी सर्व आरोग्य सेवा व सोयींनी युक्त अशी मोबाईल अँब्युलन्स लवकरच सुरू करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सोबत फोटो आहेत
दाभेमोहन : विविध विकास कामांची उद्घाटने करताना संजूबाबा गायकवाड, राजेंद्र राजपुरे शेजारी यशवंत भांड,चंदन चव्हाण, व इतर (रविकांत बेलोसे सकाळ छाया चित्र सेवा)