Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची सातारा जिल्ह्या आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची सातारा जिल्ह्या आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदार यांच्या माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली.

याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुखसो, दीपक पवार, देवराजदादा पाटील, राजेंद्र शेलार, शहाजीराव क्षिरसागर, सतिष चव्हाण, पी.सी.भोसले, डॉ.सावंत, दिलीप बाबर, दिलीप तुपे, घनशान शिंदे, श्रीमती शशिकला देशमुख, शफिक शेख, राजकुमार पाटील, सविनय कांबळे, मकरंद बोडके, निरंजन फरांदे, सौ.संजना जगदाळे, सौ.संगीतामाई साळुंखे, सौ.देशम, सौ.भिसे, सौ.जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षाची पुढील ध्येयधोरणे आणि वाटचाल यासह संघटन बांधणी बाबत विविधांगी विषयांवर चर्चा देखील केली. आगामी काळात आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला सर्वांना एकजुटीने आणि ताकतीने मोठं संघटन उभं करून या सरकारच्या विरोधात ठाम उभं राहायचं आहे. राज्यातील कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला अशा सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांना ताकदीने लढावं लागणार आहे. आपण यशवंत आणि शरदचंद्र विचाराचे पाईक असल्याने माघार घेणं आपल्या रक्तात नाही, त्यामुळे आपण सर्वजण पुन्हा लढू आणि त्याच ताकदीने पुन्हा उभ राहू असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments