प्रतिनिधी(विजया माने) : पठ्ठे बापूराव जेष्ठ नागरिक संस्था रेठरे हरणाक्ष येथे महिला व पुरुष यांची कर्करोग तपासणी मोफत करण्यात आली. सकाळी १० वाजता कृष्णा हॉस्पीटल कराड रोटरी आशा एक्स्प्रेस मोबाईल व्हॅनसह डॉ. आयुषी वर्मा, डॉ. युविका सिंग डॉ. उज्वला माने डॉ. प्रिया कदम डॉ. माधुरी गायकवाड डॉ. नेहा पडवळ श्री. विशाल मोहिते श्री. अक्षय देसाई तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी रो. सलीम मुजावर रो. चंद्रशेखर दोडमणी रो. विकास थोरात रो . भगवानराव मुळीक रो. विजय दुर्गवळे रो. सौ. राजश्री भडकुंबे तसेच महिला सरपंच जेष्ठ नागरिक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिबीराच उद्घाटन झाले.
जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले. डॉ. उज्वला माने यांनी कर्क रोगाची तपासणी का करून घेणे आवश्यक आहे याबाबत सर्व उपस्थित महिला व पुरुषांना मार्गदर्शन केले . रो . चंद्रशेखर दोडमणी यांनी उद्घाटन झाल्याचे सांगून प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी असे सांगितले. सदर शिबीराचा ८५ महिलांनी व १० पुरुषांनी लाभ घेतला.
रोटरी क्लब ऑफ मलकापूर व कृष्णा विश्वविद्यापीठ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग तपासणी शिबिर संपन्न
RELATED ARTICLES