कराड(विजया माने) : अवनी संस्थेया वतीने कराड विभागांमध्ये वीटभट्टी केंद्रावरती होळीची पोळी दान उपक्रम घेण्यात आला.यामध्ये आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. की तुम्ही तुमच्या आसपास जर होळीमध्ये पोळी दान करत असाल तर त्या पोळ्या तुम्ही होळीमध्ये न जाळता गोरगरीब गरजू मुलांना द्या जेणेकरून हा गोड घास त्यांच्या मुखात पडू शकतो.
या उपक्रमासाठी शारदा चावडीमणी मॅडम यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आसपास असणाऱ्या अपार्टमेंट मधून पोळ्या एकत्र करून आम्हाला दिल्या आमच्या काही शिक्षकांनी घरातून भात आमटी बनवून आणली हा पोळीचा गोड घास वीट भट्टी वरील या स्थलांतरित मुलांच्या व पालकांच्या मुखामध्ये घालण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला.
अवनी संस्था स्थलांतरित विकास प्रकल्प वीट भट्टी व साखर शाळा उपक्रम कराड विभाग होळीची पोळी दान उपक्रम
RELATED ARTICLES