भोसे : म. गांधी वाचनालय मेढा, ता. जावली तर्फे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंत कार्यकर्त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षिका कै. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे यांचे स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार सौ. नीलिमा आडके (प्रा. शि. बेलोशी, ता. जावली.) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याबद्दल सौ आडके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बेलोशी तालुका जावळी केंद्र शाळेतील शिक्षिका सौ. नीलिमा आडके या पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याला क्रीडा क्षेत्रातही पारंगत करण्यासाठी नेहमी धडपडत असतात. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची शैक्षणिक क्षेत्रात ओळख आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून त्यांनी मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांना बरोबर घेऊन खो खो , कबड्डी, रस्सि खेच या शाळेच्या संघाना जिल्हास्तरावर बक्षिसे मिळवून दिली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन मेढा येथील म. गांधी वाचनालयाच्या वतीने आदर्श शिक्षिका कै. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे यांचे स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त राजेंद्र मोकाशी, प्रा श्रीधर साळुंखे, वाचनालयाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रा. तुकाराम ओंबळे , सौ. आडके यांचे कुटुंबीय.उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल सौ आडके यांचे शिक्षणाधिकारी , जावळीचे गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख शंकर बिरामणे, मुख्याध्यापिका उज्वला शिंदे , बेलोशी गावचे सरपंच उमेश बेलोशे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, प्रा. तुकाराम ओंबळे, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
सोबत फोटो आहे.
मेढा : नीलिमा आडके यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर शेजारी तुकाराम ओंबळे व इतर (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)