Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रसातारा जिल्ह्यात चक्री जुगार मटक्याविरोधात आरपीआयचे आंदोलन सुरूच...

सातारा जिल्ह्यात चक्री जुगार मटक्याविरोधात आरपीआयचे आंदोलन सुरूच…

सातारा : सातारा जिल्हा हा पेन्शनरचा जिल्हा म्हणून पूर्वी ओळखला जात होता. आता दारू- जुगार- क्लब- मटक्याचं चक्री नावाच्या जुगाराने संपूर्ण सातारा जिल्ह्याला विळखा घातलेला आहे. या विरोधात (आर पी आय )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाधक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरू झाले आहे.
या आंदोलनामुळे सातारा पोलिसांची प्रतिमा चांगलीच मलिन झालेली आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिनांक ७ मार्च २०२५ रोजी चक्री जुगार मटक्या बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने लेखी निवेदन दिले होते. कारवाईची अपेक्षा ठेवली होती. परंतु, साधी एकही कारवाई करण्याचे धारिष्ट सातारा पोलीस दलाकडे राहिलेले नाही. शिरवळ खंडाळा वाई येथील दोन व्यक्ती सातारा जिल्ह्यामध्ये आय.डी. वाटप करून चक्री जुगार जोमाने चालवत आहे. हवाला कांड सारख चक्रीकांड सातारा जिल्ह्यात सुरू आहे. पोलीस अधीक्षक पासून ते साध्या भेट अंमलदारांपर्यंत याची कल्पना आहे. असं गृहीत धरून निवेदन दिले होते.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ खंडाळा व वाई येथील दोन व्यक्ती आयडी वाटप करून चक्री जुगार संपूर्ण सातारा जिल्ह्यात खुलेआम-पणाने चालवत आहेत या चक्रीकांडमध्ये पोलीस दलातील प्रत्येक घटकाला या चक्रीकांची कल्पना असून सुद्धा खेळाडू वृत्तीने याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जुगार मटका बुकिंग यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सक्षम पोलीस अधीक्षकाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलनाची वेळ आणणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांबाबत आता सहानभूती राहिलेली नाही. असे स्पष्ट करून संजय गाडे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात आठ आमदार व दोन खासदार असूनही चार मंत्रिपद दिलेले आहे. चक्रीकांड बाबत कुठे आहे कायदा? कुठे आहे पोलीस अधीक्षक? कुठे आहे जिल्हाधिकारी ? सर्वत्र आहे नुसतेच हप्ते….अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई व पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गाडे, विशाल कांबळे व महेश शिवदास यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला आहे. उद्या या आंदोलन स्थळी हलगी वादन करून पोलिसांपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.

________________________________
फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर चक्री जुगाराच्या विरोधात आंदोलन करताना आंदोलन (छाया- अजित जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments