Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रउंडाळेजवळ टेम्पोची दुचाकी ला धडक; एक ठार

उंडाळेजवळ टेम्पोची दुचाकी ला धडक; एक ठार

उंडाळे: कराड- चांदोली रोडवर उंडाळे जिंती नाक्यावर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकी स्वार ठार झाला. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता हा अपघात घडला या अपघातात ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कर्मचारी सुरेश हरिबा धाईगंडे वय ( 41) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कराड- उंडाळे -येवती- जिंती ला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर सुरेशदा हे शेवाळेवाडी कडून रात्री साडेनऊच्या दरम्यान आपले काम आटवून घराकडे निघाले होते. यावेळी त्यांनी मुख्य रस्ता क्रॉस केला व पुढे आले परंतु कराडहून रस्ता रत्नागिरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ने धाईगंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने ग्रामस्थ गोळा झाले, कराड चांदोली रोडवर उंडाळे नजीक ग्रामस्थांनी अनेकदा भरधाव जाणाऱ्या गाड्यांचा वेग कमी व्हावा यासाठी स्पीड ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग करावे अशी मागणी वेळोवेळी केली होती, पण बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यामुळे या परिसरात आजपर्यंत अनेक अपघात घडले या सर्व अपघातांना बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ,या अपघाताची नोंद उंडाळे पोलिसात झाली असून अधिक तपास उंडाळे पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments