माणसांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेले कार्य व कर्तबगारी ही त्यांच्या नावामुळे अजरामर होते. 26 नोव्हेंबर रोजी च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले आय.पी.एस .पोलीस अधिकारी अशोक कामटे यांची ओळख जगभर आहे. या पोलीस खात्यातील आय.पी.एस. अधिकाऱ्याचे सारथी म्हणून ज्यांनी काम केले त्यांचेही नाव अशोक कामटे असे आहे. आज पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती होऊन १४ वर्ष झालेले आणखीन एक अशोक कामटे आहेत. मुळातच सातारच्या भूमीमधील शहीद तुकाराम ओंबळे व इतर शहिदांनी देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडले. आज त्यांचे स्मरण करताना त्यांच्या आठवणींचा ठेवा म्हणून आजही अनेक लोक आहेत .त्यापैकी सातारा जिल्ह्यातील पोलीस परिवहन विभागातील अशोक कामटे यांच्या आज वाढदिवस आहे ११ मार्च १९५३ साली त्यांचा सांगली येथे जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांनाही योगायोगाने पोलीस खात्यामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली.
पोलीस दलातील शिस्त तसेच धाडसी वृत्ती अशी त्यांची प्रतिमा जरी दिसत असली तरी अशोक कामटे हे मनाने खूपच हळवे आहेत. ७२ वर्षे पूर्ण करून ७३ व्या वर्षी ते पदार्पण करत आहेत.१९४८ साली त्यांचे वडील दत्तात्रय पांडुरंग कामटे यांनी पोलीस दलामध्ये चांगल्या पद्धतीने सेवा करून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर १९७१ साली पोलीस अशोक दत्तात्रय कामटे हे सांगली जिल्ह्यात भरती झाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मोटार परिवहन व वाहतूक शाखेमध्ये काम केल्यानंतर १९७९ साली सातारा जिल्ह्यात त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी वाई, कराड, महामार्ग वाहतूक आणि महत्त्वाचे म्हणजे अति महत्त्वाच्या व्यक्तींना सातारा जिल्ह्यामध्ये दौऱ्यानिमित्त प्रवास करताना वाहनाचे सारथी म्हणून त्यांनी चोख कामगिरी केलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर मंत्री, विरोधी पक्ष नेते अशा अनेक मान्यवरांच्या समवेत त्यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला तसेच पुणे जिल्ह्यातही अतिमत्त्वाच्या व्यक्तींसाठी सारथी म्हणून त्यांनी पोलीस दलात आपली सेवा बजावली आहे. ३१ मार्च २०११ रोजी सेवानिवृत्तीनंतर ते सातारा शहरालगत असलेल्या कोंडवे येथे स्थायिक झालेले आहेत.
पोलीस दलातील आठवण म्हणजे बोरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एका एस.टी. बसच्या चालकाने बस चालवत पुढे जात असताना टाटा सुमो वाहनातील काही लोक एकाला मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्या आधारे तातडीने घटनास्थळी जाऊन सर्व आरोपींना अटक केली. अशा अनेक घटना त्यांनी पोलीस दलात असताना करून दाखवलेले आहेत. चांभळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे त्यांचे मूळ गाव असले तरी ते सध्या सातारकर म्हणूनच पोलीस दलातील सेवानिवृत्तीचा काळ आनंदाने व समाधानाने व्यतीत करत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत….
पत्रकार अजित जगताप सातारा ९९२२२४१२९९
________________________________
फोटो पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले अशोक कामटे