प्रतिनिधी : तुळसणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला
समग्र शिक्षा अभियान क्रीडा विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून ६,५०,०००|- (सहा लक्ष पन्नास हजार) रुपये खर्चाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना खो-खो व कब्बडीचे क्रीडांगण उपलब्ध झाले आहे.या कामासाठी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक व रामकृष्ण थोरात सर,
क्रीडा शिक्षक राजेंद्र चव्हाण सर,सर्व शिक्षक वृंद,
यांची अहोरात्र मेहनत, त्याचबरोबर ग्रामपंचायत तुळसण,ऍड.ए.वाय् पाटील साहेब (आप्पा),ग्रामपंचायत अधिकारी आशिष कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
जिल्हा परिषद प्रशासनाचे शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ,पालक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसण सर्वांच्या वतीने मन:पूर्वक आभार मानण्यात आले.
प्रत्येक पाऊल प्रगतीचे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ! तुळसण येथे समग्र शिक्षा अभियान संपन्न
RELATED ARTICLES