मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ.बी.एम.एन.कॉलेज ऑफ होम सायन्स (सशक्त स्वायत्त दर्जा), माटुंगा, मुंबई यांच्या तर्फे शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी २०२३-२४ च्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान समारंभ मोठया थाटामाटात संपन्न झाला.या समारंभात २६६ पदवीधरांच्या शैक्षणिक यशाचा उत्साहाने सन्मान करण्यात आला.या प्रसंगी टाटा पॉवरच्या ब्रँड आणि कम्युनिकेशन प्रमुख मा. ज्योती कुमार बंसल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीत उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यास प्रोत्साहित केले.
डॉ.बी.एम.एन.कॉलेज ऑफ होम सायन्स (सशक्त स्वायत्त दर्जा),माटुंगा, मुंबई तर्फे पदवीधर विद्यार्थ्यां पदवी प्रदान समारंभ संपन्न
RELATED ARTICLES