Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रथोर स्वातंत्र्यसैनिक ओंबळे सरकार यांच्या मालकीची इमारत धोकादायक ; रहिवासास धोकादायक असल्याचे...

थोर स्वातंत्र्यसैनिक ओंबळे सरकार यांच्या मालकीची इमारत धोकादायक ; रहिवासास धोकादायक असल्याचे नगरपालिकेचे नोटीस

पाचगणी : आंब्रळ गावचे सुपुत्र आणि थोर स्वातंत्र्य सेनानी बी आर ओंबळे यांच्या मालकीची पांचगणी नगरपालिका हद्दीत असणारी वास्तू रहिवास करण्यासाठी धोकादायक असल्याचे नोटीस पालिकेने बजावले आहे.

थोर स्वातंत्र्यसेनांनी, सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती कै. बी आर ओंबळे यांचे मालकीची आणि महात्मा गांधी यांच्या वास्तवाच्या खुणा जपणारी इमारत, त्यांचे वारसदार श्रीमती क्रांती संतोष मांढरे यांची खालचे गावठाण, हनुमान रोड पांचगणी येथील इमारत खूप जुनी असून ती सध्या धोकादायक बनली आहे. याबाबत पालिकेने या इमारतीचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट श्रीराम कुलकर्णी यांच्याकडून घेतला आहे. त्यानुसार पालिकेने लागलीच या धोकादायक इमारतीचा रहीवास वापर बंद करावा आणि धोकादायक इमारत उतरवून घ्यावी असे नोटीस पालिकेने जागा मालक क्रांती मांढरे यांना बजावले आहे.

विषयांकित धोकादायक मिळकतीचा वापर पुर्णपणे बंद करावा आणी इमारत उतरवून घ्यावी. अन्यथः आपणावर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमान्वये पुढील कार्यवाही करणेत येईल. आणि त्याचे होणारे सर्व खर्चास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल, याची कृपया वेळीच नोंद घ्यावी. असेही नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शेवटी यांनी या नोटीसात म्हटले आहे.

सदर इमारतीच्या बाहेर जागा मालक क्रांती मांढरे यांनी तशा आशयाचे नोटीस इमारतीबाहेर लावले आहे

सोबत फोटो आहे.
पांचगणी : कै. बी आर ओंबळे यांच्या मालकीची ही इमारत धोकादायक जाहीर करण्यात आली आहे. (रविकांत बेलोशे सकाळ छायाचित्र सेवा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments