मुंबई(प्रतिनिधी) : सुमित प्रतिष्ठान व रोटरी क्लब तर्फे बोरिवली मागाठाणे येथे ५० वर्षावरील स्पर्धकांची क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संस्कृती उपशाखा या संघाने अजिंक्य पद पटकावले तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राजेंद्रनगर शाखा संघ उपविजेता ठरला. विजेते आणि उपविजेत्यांना शिवसेना मागाठाणे विधानसभा निरीक्षक, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, उद्योजक निलेश मोटे, सुभाष (नाना) देसाई, दशरथ मांजरेकर, अभिलाष कोंडविलकर, अमित मोरे, बाबा जोशी, शाम साळवी, बबन रायजादे, राजेश बागकर, अंकुश शिंदे, दिनेश विचारे व आयोजक उपशाखाप्रमुख अमित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.*
५०+ च्या खेळाडूंची बोरीवली येथे क्रिकेट स्पर्धा ; ठाकरे गटाने पटकावली पारितोषिके
RELATED ARTICLES