Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रअंधेरी पूर्व येथे MMRDA विभागात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजन

अंधेरी पूर्व येथे MMRDA विभागात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजन

प्रतिनिधी: स्वप्नपूर्ती सोसायटी मधील महिलांनी एकत्र येऊन साजरा केला ८ मार्च जागतिक महिला दिवस. समाजातील विविध क्षेत्रात वाढलेले वर्चस्व आणि समानता विचारात घेऊन आधीच्या काळात होणारे अत्याचार व त्यासाठी सुरू केलेले उठाव व आंदोलने लक्षात घेता आता झालेले बदल नक्कीच स्वागतार्य आहे. आम्हाला ज्या महिलांनी पुढाकार घेऊन समाजात समाजाचा भाग म्हणून अधिकार निर्माण करून दिला त्याबद्दल त्यांना मनाचा सलाम.

आम्ही इमारती मध्ये सर्व सामान्य कुटुंब असून बाहेर जाऊन कामे करणे किंव्हा गृहिणी म्हणून राहणे याशिवाय जगात काय चालू आहे हे आम्हाला माहीत नसते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळण्यास मिळाले तसेच बालपण आठवले. आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत आम्ही आनंदी आहोत त्याबद्दल त्यांचे आभार.

असेच कार्यक्रम आयोजित करून आम्हाला प्रोत्साहन मिळावे ही अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. तसेच आजू बाजूला चालू असलेल्या घटनांचा निषेध केला व मुलींना सुरक्षितता राखण्याचा सल्ला दिला.

सदर कार्यक्रमाला सोसायटीमधीलं मुले, मुली, महिला व पुरुष तसेच सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

– विनोद चव्हाण

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments