सातारा(अजित जगताप) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकऱ्यांना प्रमाणपत्र सादर करताना शुल्क देऊन मुद्रांक घ्यावे लागत होते. त्याला माफी द्यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सातत्याने केली होती. त्याला यश आले असून महायुतीचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा याबाबत तातडीने अधिवेशनात निर्णय घेतला आहे. यामुळे आता राज्यातील तमाम दलित कष्टकरी शोषित वंचित घटकाला आर्थिक बचत झाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचा सत्तेतील सहभाग हा तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी निर्णय घेण्यास भाग पाडत आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व माण खटावचे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी नामदार जयकुमार गोरे यांचेही या मध्ये निश्चितच योगदान आहे. असे श्री गडांकुश यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती- जमाती, भटक्या विमुक्त तसेच कुणबी- मराठा आणि इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक अशा सर्वच जातीच्या सवलतीचा फायदा घेणाऱ्या असंख्य विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र,
उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र,राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे
मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ केले आहेत. यापूर्वी २००४ साली
राज्य शासनाच्या वतीने अध्यादेश काढला होता. त्यामध्ये फक्त सरकारी कामांसाठीच शुल्क माफ होते. आता सरसकट शुल्क माफ केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील नागरिकांना
दिलासा मला आहे. याची तातडीने अंमलबजावणी करून जे कोणी स्टॅम्प वेंडर व विक्रेते स्टॅम विक्री करताना त्यांनी संबंधितांना त्याची माहिती देणे बंधनकारक करावे. कारण, आतापर्यंत पाचशे रुपयांचा मुद्रांक शुल्क दिला जात होता. आता तशा प्रकारची फसवणूक होऊ नये. याची काळजी महसूल विभागाने न घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा श्री गडांकुश यांनी दिलेला आहे.
यापुढे एका साध्या कागदावर
स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट) अर्ज लिहून प्रमाणपत्र महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयातून मिळू शकेल. यासाठी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सहकार्य करण्यास कटिबद्ध आहेत. ज्यांना काही अडचण आली असेल तर त्यांनी सातारा जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील सर्वच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांना याबाबत कागदपत्र सविस्तर माहिती दिल्यास ते निश्चितच सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी
लागणारा एक ते दीड हजार रुपयाचा खर्च वाचलेला आहे. या वाचलेल्या खर्चातून लोकांनी चांगल्या विचाराची पुस्तके खरेदी करून आपले ज्ञान संपदा वाढवावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच महायुतीचे माण खटाव तालुक्यातील आघाडीचे समर्थक संतोष भंडारे,अजित कंठे, रामचंद्र पवार, रामागुडे, थोरात व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.