मेढा (अजित जगताप) : स्वराज्याची स्थापना करणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले यासाठी छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श महिलांनी घ्यावा. देशाच्या जडणघंडी मध्ये महिलांची खूप मोठे योगदान आहे अशा शब्दात माता-भगिनींना मार्गदर्शन करून शनिवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने भारतीय जनता पार्टी व बाबाराजे मित्र समुह मेढा , तालुका जावळी जिल्हा सातारा महिला दिन साजरा केला. मेढा नगरीत झालेल्या या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने भाजपच्या वतीने महिलांचा सन्मान राखला गेला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उपस्थितीत जावळी तालुक्याचे प्रमुख ठिकाण मेढा नगरीतील महिलांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मंत्री महोदय नामदार भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. जावळी तालुक्यातील मेढा नगरीत झालेल्या या कार्यक्रमामुळे महिला वर्गाने खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
एकाच वेळी मंत्री महोदय व मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन, सत्कार, मनोरंजन व नेत्यांकडून आपुलकी आणि शाब्बासकी मिळाल्यामुळे माता-भगिनींचा उत्साह तूगणित झाला होता. महिला दिनाचा कार्यक्रम असतानाही नेहमीप्रमाणे काही पुरुषांच्या लुडबुडीमुळे महिला वर्गांनी यामध्ये आता बदल होणे आवश्यक आहे. नेत्यांपेक्षा त्यांच्या घरातील माता-भगिनींची उपस्थिती अपेक्षित होती. अशी उपयुक्त सूचना नाव न सांगण्याच्या अटीवर केली.
होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुध्दा पैठणीसह विविध बक्षीसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमासाठी मेढा नगरीच्या महिला पदाधिकारी द्रौपदा मुकणे, संगीता वारागडे, रूपाली वारागडे, शुभांगी देशपांडे, स्वाती देशमुख, रूपाली देशपांडे, रेश्मा शेडगे, शुभांगी गोरे, सुनीता तांबे ,सुवर्णा गोरे ,जास्मिन खान, पुष्पा तांबोळी, अलका पवार , ,कल्पना जवळ ,रेश्मा शेडगे, दिपाली शिंदे आदी नगरसेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जावळीचे सर्वपक्षीय नेते वसंतराव मानकुंमरे , भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे , उद्योजक विजय शेलार, नगरसेवक विकास देशपांडे , संतोष वारागडे , दत्ता पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाची संलग्न असलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. योगिता मापारी यांनी सुत्र संचलन केले.
________________________________________
फोटो मेढा ता जावळी या ठिकाणी महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला महिला वर्गांना मार्गदर्शन करताना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले (छाया- निनाद जगताप, मेढा)