Friday, August 22, 2025
घरमहाराष्ट्रमहिलांनी आर्थिक सक्षम व्हावे : रविकांत बेलोशे ; दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या...

महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे : रविकांत बेलोशे ; दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव

भोसे: आजच्या बदलत्या काळात महिलांना त्‍यांचे हक्‍क आणि बरोबरीचे स्थान मिळवायचे असेल तर त्‍यांनी आर्थिक सक्षम व्हावे. त्‍यासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराचे अनेक पर्याय पडताळून पाहायला हवेत,’’ असे प्रतिपादन दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे यांनी केले.
दापवडी (तालुका जावळी) येथील दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. काटवलीच्या वतीने महिला दिनानिमित्त समाजातील यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी श्री. बेलोशे बोलतं होते.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र गावडे, संचालक तुकाराम घाडगे, प्रकाश रांजणे, शिवराम पवार, मधुकर पवार, रामचंद्र चिकणे, रामचंद्र रांजणे, बाबुराव रांजणे, रामचंद्र बेलोशे, भीमराव खरात, पांडुरंग शिंदे, सौ. इंदू शिंदे, तसेच विश्वकर्मा पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर भिलारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण भागातील उद्योजिका सौ. रेखा भिलारे यांचा तसेच स्पर्धा परीक्षा यशस्वीता कु. सोनाली पवार यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच बचत गटाच्या प्रेरिका सुनीता बेलोशे, धनश्री शिंदे, सीमा रांजणे, स्नेहल रांजणे, अर्चना गोळे, पोलिस पाटील सुनीता रांजणे, शोभा रांजणे तसेच बचत गटाच्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.संस्थेचे संस्थापक कै. स. म. बेलोशे गुरुजी यांचे आदर्श आणि विश्वासावर चाललेल्या या पतसंस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील यशस्वी महिलाना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा यासाठी आम्ही हा अनोखा उपक्रम राबवला असल्याचे ज्येष्ठ संचालक तुकाराम घाटगे यांनी सांगितले.
शेखर भिलारे यांनी सांगितले संस्थेला ३२ वर्षाची यशस्वी परंपरा आहे. ती पुढे नेण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे हे कौतुकास्पद आहे.
रेखा भिलारे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या आपल्या रोजच्या उद्योगातूनही आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे महिलांनी ओळखावे. संस्थेने माझ्यासारख्या छोट्या उद्योजिकेला सन्मानित करून मला पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा दिली आहे.
सोनाली पवार म्हणाल्या सर्व महिलांनी आपल्या मुलांना त्याच्या आवडत्या करिअरसाठी भक्कम पाठिंबा द्यावा. त्यातूनच ते पुढे आकाशाला गवसणी घालणार आहेत. संस्थेने माझा सन्मान करून मला जबाबदारीचे आगळे वेगळे बळ दिले आहे.
यावेळी व्यवस्थापक अनिल रांजणे, करहर शाखा प्रमुख शंकर गोळे, पांचगणी शाखा प्रमुख प्रकाश रांजणे, भोसे शाखा प्रमुख लक्ष्मण ओंबळे, वसुली अधिकारी अजित बेलोशे, शामराव रांजणे, रामदास गलगले, सुनीता राजपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक प्रकाश रांजणे केले. सूत्रसंचालन अनिल रांजणे यांनी केले तर तुकाराम घाडगे यांनी आभार मानले.
सोबत फोटो आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments