Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रकृष्णा घोगले (घोगले मामा) रा.हातीव यांचे वृद्धापकाळाने निधन

कृष्णा घोगले (घोगले मामा) रा.हातीव यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई (शांताराम गुडेकर ) : कोकणची लोककला जोपसणारा, विनोदाचे धडे देणारा एक अवलिया आज काळाच्या पडद्या आड.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु .हातीव गावातील कृष्णा घोगले (घोगले मामा)यांचे काल (दि.६ मार्च २०२५) रोजी रात्री १०:३० वा. वृद्धापकाळाने निधन झाले.घोगलेमामा आपले उभे आयुष्य कासार कोळवणसाठीच जगले.जवळजवळ दोन पिढ्या त्यांनी तमाशामध्ये स्री पात्र सजवले.कासार कोळवणचा तमाशा आणि घोगलेमामा हे जणू समिकरणच होऊन गेले होते.मामा हे कायम कलाकार म्हणूनच जगले.आम्हाला नाट्य अभिनय याचा गंधही नव्हता.फक्त गावात तमाशा करायचा ही स्वर्गीय शंकर गुरव तात्या यांची कल्पना उचलून धरत तमाशात काम करु लागलो.तेव्हा अभिनय कसा करायचा, शब्दफेक कशी हवी,गण,गौळण,लावणी सूरात कशी म्हणायची,बतावणीतील विनोद कसे सादर करायचे हे सर्वच कोणी शिकवले व करुन घेतले असेल तर त्याचे शिल्पकार होते फक्त आणि फक्त आदरणीय घोगलेमामा. कला जगवायची म्हणजे काय हे मामा स्व:ता जगून आम्हाला जगायला शिकवले.अशा या कोकणची कला जोपासून नावलौकीक मिळवलेला अवलिया कलाकार आज काळाच्या पडद्याआड जाऊन अनंतात विलिन झाला.मामा आपली स्मृती सदैव स्मरणात राहीली.आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करुन आपल्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो अशी प्रार्थना करत कासार कोळवण गावातील उप सरपंच प्रकाश तोरस्कर, पत्रकार मोहन कदम,नंदकुमार गुरव,सेवा निवृत्त शिक्षक करंबेळे गुरुजी आणि त्यांच्या सोबत काम केलेल्या कलाकार यांनी मामा यांना साश्रुनयनानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या पंचक्रोशितील लोकप्रिय तमासगीर कलाकार,कासार कोळवणचा होळी शिमगा ज्यांच्याशिवाय अपूर्ण वाटायचा, अशी पन्नास वर्ष आणि तीन पिढ्या गावची करमणूक करणारे आमचे अगदी जवळचे आणि गुरुसमान व्यक्तिमत्त्व असणारे ज्यांच्या बद्दल लिहावे तितके कमीच आहे तरी थोडक्यात कोकणचे बालगंधर्व कृष्णा बाळू घोगले उर्फ घोगलेमामा यांचा वार्धक्याने स्वर्गवास झाला.
श्री.कृष्णा दादा घोगले म्हणजे एक जातीवंत कोकणी कलावंत.आपल्यातली कला स्वतः जवळ न ठेवता सतत दुसऱ्या पर्यंत पोचहचविण्याचे काम त्यांनी केले आहे . एका महान कलावंताचे निधन झाल्याची बातमी ऐकताच खूप दुःख झाले.संपूर्ण हातीव गावावर शोककळा पसरली आहेच सोबत कासार कोळवण गावावर ही शोककला पसरली आहे.त्यांचा कासार कोळवण गावाशी तमाशा कलाकार म्हणून असलेला संबंध ३० ते ४० वर्षे अखंड होता.कोकणात तमाशाची लोककला जिवंत ठेवण्याचे काम कासार कोळवण ग्रामस्थांनी अखंडपणे आजही चालू आहे.यामध्ये घोगले दादांचा खूप मोठा होता त्यांच्या जाण्यामुळे खूप मोठा कलावंत गेल्याची जाणीव त्या क्षणी झाली.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments