Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र काँग्रेस कमिटीची गरवारे क्लब येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची गरवारे क्लब येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

प्रतिनिधी : महाराष्र्ट प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक कालरोजी मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. महाराष्र्टाचे प्रभारी मा.श्री.रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेस पक्ष संघटनेच्या मजबुतीबाबत अनेक विषयांवर चर्चा झाली.यावेळी उपस्थित महाराष्र्ट राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री.मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे इतर मान्यवर नेतेगण व पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे एकेकाळी भारतातील सर्वात मोठे आणि प्रभावशाली राजकीय संघटन होते आर्यनलेडी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देशभरात एक वेगळीच छाप निर्माण केली होती. “गरीबी हटाव” या घोषणेने काँग्रेसने प्रत्येक घरात आपले अस्तित्व निर्माण केले होते त्याकाळी काँग्रेसचे कार्यकर्ते हीच संघटनेची खरी ताकद होती. गावागावात कार्यकर्ते स्वतःहून प्रचार करायचे, वेळप्रसंगी स्वतःचा पैसा लावायचे आणि जनतेचे दुःख-सुख समजून घ्यायचे

काँग्रेसच्या आर्यनलेडी माजी पंतप्रधान.इंदिराजी गांधी यांची शिस्त आणि नेतृत्व म्हणजे मजबूत संघटन यांचा आदर्श नमुना होता.त्यांच्या नेतृत्वाखाली नेतेगिरीपेक्षा कार्यकर्ता संस्कृतीला महत्त्व जास्त मिळत होते.आणीबाणीनंतर काँग्रेसने सत्तेबाहेर जाऊनही पुन्हा एकदा मजबूत संघटन उभे केले होते.पंजा चिन्हाची जनमानसात असलेली भावनिक ओळख काँग्रेसच्या यशाचे मुख्य कारण होती.

माहिती तंत्रज्ञानाचे शिल्पकार पंतप्रधान राजीवजी गांधी आणि काँग्रेसमधील बदल हे इंदिराजी गांधींच्या हत्येनंतर होत गेले राजकारणासाठी तयार नसलेले राजीवजी गांधी पंतप्रधान झाले. सुरुवातीला त्यांनी देशहिताचे निर्णय घेतले आणि काँग्रेसला ऐतिहासिक 400 हून अधिक जागा मिळवून दिल्या. मात्र, राजकारणाचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्यावर संघटनेतील अस्थिर नेत्यांनी दबाव टाकला.यामुळे काँग्रेसमधील शिस्त ढासळत गेली नेतृत्व कमी पडत गेले त्यामुळे संघटनेचा आत्मा असलेला कार्यकर्ता बॅकफुटेजला जात राहीला आणि संघटनेच्या शरीरावरील नेतेगिरीची चरबी वाढत गेली .

आज पक्ष संघटनेत नेते जास्त, कार्यकर्ते कमी झाले आहेत कारण स्थानिक नेत्यांचे कार्यकर्त्यावर होत असलेले र्दुलक्ष स्व.इंदिराजी गांधींच्या काळात कार्यकर्त्यांना महत्त्व होते,पण नंतरच्या काळात काही कार्यकर्ते स्वतःला नेते समजू लागले त्यामुळे काँग्रेसचे जमिनीवरील संघटन कमजोर होत गेले निस्वार्थ कार्य करनार्‍या कार्यकर्त्यांची जागा स्थानिक स्वार्थी नेत्यांनी घेतली.याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला झाला त्यामुळे जनतेची तिळमात्र कदर नसनारे स्वताचा व्यवसाय मोठा करण्याच्या स्वार्थीहेतूने निवडनुक रिंगनात धनशक्तीच्या जोरावरती उतरलेले जनतेला नको असलेले EVM पुरस्कृत भाजप उमेदवार विजयी झाले.

आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारत जोडो आणि न्याय यात्रा काडुन देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी जनजागृती करत हजारो किलोमीटर पायपीट करुन केंद्रातील हुकुमशहा सरकारच्या खुर्चीचे पाय खिळखिळीत करुन आव्हान देनारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे प्रामाणिक नेतृत्व आज काँग्रेसला लाभले आहे. मात्र, त्यांच्या संदेशाचा प्रसार करणारे कार्यकर्ते वरिल संभ्रमीत मनअवस्तेच्या कारणामुळे कमी पडताना दिसत आहे.

संघटन पुनर्जीवित करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभे करुन त्याला संघटनात्मक ताकतीचा विश्वास देऊन त्याच्या खचलेल्या मनाला फुंकर मारने आवश्यक आहे.जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, भाषणांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते काँग्रेसला हवे आहेत त्यासाठी जमिनीवरील कार्यकर्त्यांना महत्त्व देऊन संघटन मजबूत करणे गरजेचे आहे

काँग्रेस नेत्यांनी जर या वरिल महत्वपुर्ण बाबींवर लक्ष केंद्रीत करुन कार्य केले तर निश्चितच पुन्हा एकदा मजबूत संघटन बनू शकेल.त्यामुळे कार्यकर्ता संस्कृतीचा पुनर्जन्म आणि जनतेशी जवळीक काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देईल हा माझा विश्वास आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments