Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबईत नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे शिबिर संपन्न

नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे शिबिर संपन्न

प्रतिनिधी : शेतकरी शिक्षण संस्था घणसोली नवी मुंबई या ठिकाणी दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी विद्यार्थी शिक्षक व विभागातील नागरिक यांच्याकरिता दोन सत्रांमध्ये नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून उपनियंत्रक माननीय श्री विजय जी जाधव साहेब यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन प्रबोधनात्मक जनजागृती पर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रसंगी सहाय्यक उपनियंत्रक अनंगसिंग गढरी साहेब यांनी प्रात्यक्षिकांसह महत्त्वाची माहिती देऊन प्रबोधन केले .यावेळी विभागीय क्षेत्ररक्षक अरुण सातपुते ,स्वयंसेवक रमेश संकपाळ , हनुमंत सावळे , यश दळवी यांनीही सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडले .शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कोलते सर यांनी केलेले सहकार्य तसेच सुमारे ७०० विद्यार्थी ५०

शिक्षक व विभागातील नागरिक यांनी अमूल्य वेळ देऊन सहभागी होऊन आपत्ती व्यवस्थापन प्रबोधनाचा लाभ घेतला .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments