Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रजिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचिततर्फे आंदोलन संपन्न !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचिततर्फे आंदोलन संपन्न !

ातारा : बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथे मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.
भारत देशातील बिहार राज्यातील बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाबुद्धविहार हे बौद्ध धम्मीयांच्या ताब्यात नसून ते तेथील हिंदूंच्या ताब्यात आहे. ते महाबोधी महाविहार ताब्यात मिळावे.यासंदर्भात आंदोलनस्थळी जिल्हा वंचितचे महासचिव शरद गाडे,ज्येष्ट नेते झेले-पाटील,ऍड.दयानंद माने व भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई मंगेश डावरे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष मिलिंद कांबळे,अमोल गंगावणे, प्रकाश सपकाळ,बाळासाहेब भोसले,यश गाडे,बाळकृष्ण गाडे,योगेश कांबळे,काशिनाथ गाडे, उत्तम भालेराव,योगेश शिंदे,अजित कांबळे,गौरव भंडारे, अनिल सपकाळ,सिद्धार्थ परिहार,सुनील खरात,संजय गायकवाड,प्रमोद क्षीरसागर, भीमराव परिहार, मोहन खरात, पिराजी सातपुते,सौरभ थोरात, महेंद्र सोनावणे, च.मिलिंद,नितीन गायकवाड,अरुण राजपुरी, अशोक दीक्षित,अशोक रोकडे, जिल्हाध्यक्षा सुनंदा मोरे, युवा महासचिव सायली भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव दिलीप फणसे, तालुका अध्यक्षा मीनाताई वाघमारे,सुजाता गायकवाड, वनिता उघडे,कल्पनाताई कांबळे,शोभा भंडारे, द्राक्षाताई खंडकर व अनेक महिलावर्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर व अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,वंचितचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते,पत्रकार व आबेडकरवादी प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना पदाधिकारी,मान्यवर व कार्यकर्ते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments