प्रतिनिधी : दादर(पूर्व)हिंदुकाॅलनी १ ली गल्ली येथील ” पसायदान ” या संस्थेच्या वतीने व मुंबई महानगर पालिका एफ/उत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ” स्वच्छता अभियान “राबविण्यात आले होते.त्या अभियानाला स्थानिक खासदार म्हणून अनिल देसाई यांनी सदिच्छा भेट देऊन संस्था चालक प्रशांत कानकोनकर यांचे मनःपूर्वक कौतुक करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्यांच्या सोबत विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे,वडाळा विधानसभा संघटक राकेश किशोर देशमुख, सहनिरीक्षक सुरेश गणपत काळे, उपशाखाप्रमुख प्रदीप कदम,उल्हास पांचाळ, किरण देशमुख आदी शिवसैनिक उपस्थित होते.
पसायदान संस्थेद्वारे म न पा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम;संस्थाप्रमुखाचा सत्कार
RELATED ARTICLES