सातारा(अजित जगताप) : बहुजन समाज शिक्षण घेत असल्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा नाकारले आहे. सत्य स्वीकारले असून हे अनेकांना पचनी पडत नाही. त्यामुळे उद्योगपतींच्या विषारी विळख्यात बहुजन समाजाच्या शिक्षणाची कवाडे बंदिस्त करण्याच्या प्रयत्न होत आहे आपण सतर्क राहिले पाहिजे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांनी सातारा येथे केले.
जकातवाडी येथील शारदाताई पवार आश्रम शाळेत अखिल भारतीय मुक्ता साळवी यांच्या सातव्या साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ शरद गायकवाड बोलत होते.
मी पणा अहंकार. गट – तट .मनभेद व मतभेद गाढुन टाकले पाहिजेत.सर्व परिवर्तनवादी व पुरोगामी लोक एकाग्र बुद्धिमत्तेचा जीवावर समांतर प्रश्नावरील किमान मुद्द्यावर लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यास सज्ज झाले पाहिजे. सध्याचा प्रतिगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा पुरोगामी बनवायचा आहे. नोबेलच्या व ज्ञानपीठच्या मोलाचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ” भारतरत्न ” देऊन त्यांचा उचित गौरव करण्याची केंद्र सरकारकडे मागणी पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा केला पाहिजे.
एकविसाव्या शतकात अंधश्रध्दा निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन. विषामता निर्मूलन. भ्रष्ट्राचार व्यसनाधीनता. बेरोजगारी आज पर्यंत ३० वर्षातील तीन लाख शेतकर्यांनी आत्महत्या व वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी व महिला व युवतींवर दिवसाढवळ्या वाढत्या अत्याचारातून घडत आहेत .या घटना रोखण्यासाठी समाज मनाची गरज आहे . असे प्रा. डॉ. गायकवाड यांनी सांगितले
गल्ली पासून दिल्ली दिल्ली पर्यंत द्वेषाचे राजकारण चालू असून पोटात मनूस्मृति आणि ओटात संविधान हा कावा ओळखायला हवा आहे.
हे वेळीच बंद करायला हवे अन्यथा देशाचे ऐक्य अबाधित राहणार नाही .या देशाचे तुकडे पडतील. अशी ही त्यांनी भीती व्यक्त केली.
प्रारंभी पोवई नाक्यावर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजवाडा मार्गे जकातवाडी या मार्गावरून साहित्यदिंडी काढण्यात आली. संमेलनाचे उद्घाघाटन जेष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले यांनी केले.
मुक्ता साळवी यांचा निबंध व सध्याची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती यावर प्रा. प्रकाश नाईक, कोल्हापूर व चंद्रकांत खंडाईत यांनी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने होते.
सचिन बागडे यांनी प्रास्ताविक केले तर सत्यवान कमाणे यांनी स्वागत केले महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ व युवा साहित्यिक उपस्थित होते. या साहित्य संमेलनाला प्रा. तुकाराम ओंबळे, मोहन जगताप, उमेश खंडजोडे, वामन मस्के, उदय तोरणे, अविनाश जगताप, संध्या कांबळे, विमल तुपे, मंगला साठे, मच्छिंद्र जाधव, वामन गंगावणे, फुले- शाहू- आंबेडकर व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.
_________________________फोटो — सातारा येथे झालेल्या मुक्ता साळवी साहित्य संमेलनाला अध्यक्ष भाषण करताना प्रा. डॉ. शरद गायकवाड
उद्योगपतींच्या विळख्यात. बहुजनांनाची शिक्षण व्यवस्था – प्रा.डॉ. शरद गायकवाड
RELATED ARTICLES