तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र खंदारे यांनी शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांच्या अक्षरगणेशाचे कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शिक्षणविस्तार अधिकारी संभाजी कानवटे, दैवता साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शबनम मुजावर आणि रविंद्र खंदारे यानी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची व सामाजिक क्षेत्रातील कार्याची माहिती घेतली. ‘‘खूप छान, आपली कला खूपच सुंदर आहे, आपणांस खूप खूप शुभेच्छा’’ अशा शब्दात शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी डाॅ.डाकवे यांचे कौतुक केले.
डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिंना स्केच, शब्दचित्र, रेखाचित्र, ठिपके चित्र, स्क्रिबलिंग चित्र इ. कलाकृती भेट दिल्या आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांनी कला जोपासत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला स्कुल बॅग-संगणक वाटप, मोफत वहया वाटप, एक वही एक पेन उपक्रम, ग्रंथतुला करुन पुस्तकांचे वाटप, माणूसकीच्या वहया, ज्ञानाची शिदोरी, गणवेश वाटप, शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप, अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, जि.प.प्राथमिक शाळा डाकेवाडी रंगकाम, शाळा तक्ते वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, पुस्तक भेट अभियान, सॅल्युट कार्ड स्पर्धा, गरजू विद्यार्थ्यांसाठी यांच्या शैक्षणिक फी ची मदत, 3 री विद्यार्थी स्वाध्याय माला वितरण, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्याचे वाटप, श्री बालाजी मतिमंद मुलांच्या शाळेस मदत, चित्रकला स्पर्धा, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचं झाड इ. शैक्षणिक उपक्रमासह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.
शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांच्या या कलात्मक उपक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, आणि द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांनी घेतली आहे.
शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केेले डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक
RELATED ARTICLES