Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रजागतिक श्रवण दिनानिमित्त श्रवणविषयक समस्या असलेल्या मुलांकरिता लीलावती रुग्णालयाचा विशेष जागरूकता उपक्रम

जागतिक श्रवण दिनानिमित्त श्रवणविषयक समस्या असलेल्या मुलांकरिता लीलावती रुग्णालयाचा विशेष जागरूकता उपक्रम

मुंबई : दरवर्षी 3 मार्च हा दिवस बहिरेपणा आणि श्रवणशक्ती कमी करण्यासाठी जागतिक श्रवण दिन साजरा केला जातो. या दिवसाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण जगभरात विविध उपक्रम राबविले जातात. यानिमित्ताने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयाने जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले असून मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याशी संबंधित आव्हाने आणि उपायांबद्दल जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात श्रवणशक्ती कमी होण्याची कारणे आणि परिणाम, श्रवणशक्ती पुनर्संचयित करण्यात इम्प्लांटेबल श्रवणयंत्रांची भूमिका आणि प्रगत उपचारांचा लाभ घेतलेल्या कुटुंबांचे प्रेरणादायी अनुभवांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांमध्ये आयर्लंडच्या वाणिज्य दूतावासातील श्रीमती अनिता केली, ईएनटी सर्जन डॉ. क्रिस्टोफर डीसूझा, स्थायी विश्वस्त श्री. प्रशांत मेहता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरज उत्तमणी उपस्थित होते. या कार्यक्रमात सिनेअभिनेता शर्मन जोशी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे, लीलावती हॉस्पिटलने श्रवणविषयक समस्या असलेल्या मुलांसाठी अत्याधुनिक उपचार प्रदान करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली.
लीलावती हॉस्पिटल येथे नवजात मुलांमध्ये श्रवणशक्ती तपासण्यासाठी नवीनतम उपकरणे आणि अत्याधुनिक ऑपरेटिंग रूम, सीटी स्कॅन, एमआरआय इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
वयाच्या पहिल्या दोन वर्षांच्या आत कॉक्लियर इम्प्लांट्स केलेली मुलं श्रवणशक्ती पूर्णपणे पुनर्संचयित करण्यास सक्षम ठरतात. कॉक्लियर इम्प्लांट्स दोन्ही कानात एकत्रितपणे घातले जातात. लीलावती रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट्स करण्यात आलेली मुले सामान्य श्रवणशक्ती असलेल्या मुलाप्रमाणेच सामान्य शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १,००,००० मुले बहिरेपणासह जन्माला येतात आणि हे देशासाठी एक मोठे संकट ठरू शकते.
लीलावती हॉस्पिटलचे कन्सल्टंट ईएनटी सर्जन डॉ. क्रिस्टोफर डीसूझा सांगतात की, लीलावती हॉस्पिटलने मुलांसाठी ५०० हून अधिक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांचे जीवन बदलले आहे आणि त्यांची श्रवण क्षमता पुनर्संचयित झाली आहे. यापैकी १०% प्रक्रियांमध्ये पूर्वी इम्प्लांट्स घेतलेल्या आणि पुढील वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या मुलांसाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. कॉक्लियर इम्प्लांटचा एकूण खर्च ८ लाखांपेक्षा जास्त असल्याने, वंचित मुलांसाठी या शस्त्रक्रिया न परवडणाऱ्या असून त्यांना आर्थिक मदत महत्त्वाची आहे. प्रशांत मेहता यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे, ज्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
डॉ. क्रिस्टोफर डीसूझा पुढे सांगतात की, मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी झाल्यास हे त्यांचे संवाद कौशल्य, संज्ञानात्मक विकासावर आणि एकूणच जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम करतात. निदान न झाल्यास किंवा उपचार न केल्यास संवादातील अडथळे हे शैक्षणिक कामगिरीवर परिणाम करते आणि सामाजिक अलगावास कारणीभूत ठरते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, इम्प्लांट करण्यायोग्य श्रवण उपकरणे आता मुलांना सामान्य जीवन जगण्यास मदत करण्यास प्रभावी ठरतात. लवकर निदान करणे गरजेचे असून मुलाला जितक्या लवकर उपचार मिळतील तितकेच त्यांच्यात संभाषण कौशल्ये विकसित होण्याची शक्यता वाढते. पालकांनी आणि काळजीवाहकांनी सतर्क राहून श्रवणविषयक अडचणींच्या सुरुवातीच्या लक्षणांवर वैद्यकीय मार्गदर्शन करावे.
लीलावती हॉस्पिटलचे स्थायी विश्वस्त प्रशांत मेहता सांगतात की, लीलावती हॉस्पिटल नेहमीच वैद्यकीय प्रगती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिले आहे. अशा उपक्रमांचे आयोजन करून, आम्ही वैद्यकीय उपचार आणि त्यांचा लाभ घेऊ शकणाऱ्यांमधील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करतो, मुलांना श्रवणविषयक आव्हानांवर मात करण्यास आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments