मुंबई (प्रतिनिधी) : खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते मुंबई येथील साहित्यिक डॉ. अलका नाईक यांच्या ‘समर्पण’ या अवयवदानावर आधारित कथासंग्रहाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते दिल्ली येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुण्याचे माजी उप आयुक्त श्री. ज्ञानेश्वर मोळक, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद गोरे, साहित्यिक डॉ. रसनकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
वेगवेगळ्या अवयवांपासून वंचित आणि कुणाकडून तरी अवयवदानाच्या मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या गरजूंची व्यथा वेदना लिहून डॉ. अलका नाईक यांनी संपूर्ण समाजाला अवयवादानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे लेखन केले आहे.
डॉ. अलका नाईक यांनी स्वतःचे कवितासंग्रह प्रसिद्ध केले आहेतच शिवाय गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांची कविता संपादित करून त्यांचेही प्रकाशन स्वखर्चाने केले आहे. त्यातील काही कवितासंग्रह माॅलदीव , मॉरिशस, इंडोनेशिया, नेपाळ आणि थायलंड या परदेशात विश्व साहित्य संमेलनात प्रसिद्ध झालेली आहेत. गेली चार दशके आपल्या सामाजिक सेवेबरोबरच, काव्यवाचन कार्यक्रम, अवयवदान, केशदान चळवळ, मानसिक स्वास्थ्य ई. व्याख्यानाद्वारे त्यांनी प्रशंसनीय अशी साहित्य व समाजसेवा केली आहे. महिला उद्योजिका आणि सक्षमीकरण यासाठी त्यांनी कार्य केले आहे, त्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार आणि सुवर्णपदकही प्राप्त झाले आहे.
अनेक साहित्यिक उपक्रमामध्ये अध्यक्ष, प्रमुख अतिथी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मराठी भाषेचा आणि साहित्याचा प्रचार , प्रसार करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. तसेच अनेक कवी, लेखक घडवून त्यांच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना देऊन त्यांना मार्गदर्शनही केले आहे. अनेक शाळा- काॅलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी समुपदेशन व्याख्याने देऊन मार्गदर्शन केले आहे.