Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रमंत्री गोरेंशी फराकत घेतलेले वडुज नगराध्यक्ष काळे विरोधात अविश्वास ठराव दाखल.....

मंत्री गोरेंशी फराकत घेतलेले वडुज नगराध्यक्ष काळे विरोधात अविश्वास ठराव दाखल…..

सातारा

(अजित जगताप) : वडूज नगरपंचायतीच्या वादग्रस्त नगराध्यक्ष सौ मनीषा काळे यांना वारंवार संधी देऊन सुद्धा त्यांच्या कामकाजामध्ये परिवर्तन घडले नाही. असा आरोप करत वडूज नगरपंचायतीच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अविश्वास ठराव दाखल केली.

वडूज नगरपंचायत हि नव्याने स्थापन झालेली
असून वडुज नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२२ रोजी झालेली आहे. त्यामध्ये ९ महिला सदस्य व ८
पुरुष सदस्य असे एकूण १७ सदस्य निवडून आले आहेत. वडुज नगरपंचायतीची नगराध्यक्षा व उपनगरांध्यक्ष पदाची
निवड दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली. त्यामध्ये नगराध्यक्षा म्हणून अपक्ष नगरसेविका सौ. मनीषा रविंद्र काळे यांची निवड झाली होती परंतु ज्या उद्देशाने नगरपंचायत सदस्यांनी सौ. मनीषा रविंद्र काळे यांची नगराध्यक्षा म्हणून निवड केली होती
त्या उद्देशास नगराध्यक्षानी हरताळ फासला आहे. नगराध्यक्षा या पदावर आल्यापासून चुकीच्या पध्दतीने वागत आहेत..त्या
कोणत्याही सदस्याला विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. मनमानी पद्धतीने वागत आहेत. त्यांच्या या चुकीच्या
वागण्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. नगराध्यक्षा म्हणून शहराच्या विकासासंदर्भात आतापर्यंत कोणतीही
भूमिका घेतली नाही तसेच जबाबदारी पार पडली नाही. त्यामुळे आम्ही खाली सही करणार सर्व नगरसेवक व नगरसेविका
अविश्वास ठराव मांडणेबाबत स्वतः मागणी करीत आहोत. आमचेवर कोणाचाही दबाव नाही. म्हणून आम्ही या खाली सही
करणार सर्व नगरसेवक व नगरसेविका नगराध्यक्षा सौ.मनीषा रविंद्र काळे यांचेवर अविश्वास ठराव दाखल करीत
आहोत व तो मंजूर होनेकामी विशेष सभा बोलविणेत यावी हि विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नगरसेवकाचे
सौ. आरती श्रीकांत काळे,सौ. राधिका गिरीश गोडसे,श्री. मनोज रामचंद्र कुंभार,श्रीमती. शोभा दीपक बडेकर, सौ. रेखा अनिल माळी, सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे,श्री. सोमनाथ नारायण जाधव
श्री. बनाजी दिनकर पाटोळे,सौ.शोभा तानाजी वायदंडे,श्री. ओंकार दिलीप चव्हाण,श्री. अभयकुमार विठ्ठलराव देशमुख,,सौ. स्वप्नाली गणेश गोडसे,श्री.सुनील हिंदुराव गोडसे,सौ. रोशना संजय गोडसे,
श्री. जयवंत माधवराव पाटील,श्री. सचिन तुकाराम माळी व वरुण नगरपंचायतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक बंडा गोडसे अनिल माळी व मान्यवर उपस्थित होते सदर निवेदनाची प्रत
मुख्याधिकारी, वडुज नगरपंचायत वडुज यांना माहितीसाठी सादर केली आहे.
दरम्यान ,वडूज नगराध्यक्ष सौ मनिषा काळे या अपक्ष नगरसेविका निवडून येऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात गेल्या व नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजप गोटात प्रवेश केला होता .आता त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याने वडूज नगरीत राजकीय दृष्ट्या ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याशी फारकत घेतल्याने अविश्वास ठराव दाखल झाला असून नवीन नगराध्यक्ष पदासाठी आतापासूनच मोर्चा बांधणी सुरू झालेली आहे.

______________________________________________
फोटो सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे वडूज नगराध्यक्ष अवश्य ठराव दाखल करताना नगरसेवक व नगरसेविका (छाया- अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments