Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्र*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "परिवहन भवना " चे भुमिपुजन संपन्न*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “परिवहन भवना ” चे भुमिपुजन संपन्न*

मुंबई : (२ मार्च ) मोटार परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या ” परिवहन भवन ” या नव्या इमारतीचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सुमारे १२८०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. हि इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ तसेच अप्पर मुख्य सचिव (परिवहन) श्री. संजय सेठी, परिवहन आयुक्त श्री. विवेक भीमनराव हे उपस्थित होते .
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (ATS), स्वयंचलित चालक चाचणी केंद्र (ADTT), एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ITM) अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालकांना अनुशासित करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून भविष्यात रस्ते सुरक्षेला अग्रक्रम देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालविण्याबाबत प्रबोधन आणि अनुशासन च्या माध्यमातून शिक्षित करण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागाने स्विकारणे आवश्यक आहे.
दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांमध्ये ” ज्याच्याकडे पार्किंगची जागा त्यालाच वाहन खरेदीची मुभा ” देणाऱ्या पार्किंग धोरणास शासनाने पाठिंबा द्यावा या मागणीला दुजोरा देत, भविष्यात नागरिकांनी आपले वाहन खरेदी करत असताना त्यासाठी पार्किंग व्यवस्था आहे का नाही? याची खात्री करणे आवश्यक असून जर स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर महापालिकेच्या मदतीने सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेचा वापर करण्याची हमी घ्यावी अशा पद्धतीचे पार्किंग धोरण परिवहन विभागाने तयार करावे त्याला शासनाचा पूर्ण पाठिंबा असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. ते पुढे म्हणाले की, सर्व देशभर GST लागू असल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचे महत्व कमी झाले असून भविष्यात व्यापार वृध्दी साठी व माल वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व सीमा तपासणी नाके बंद करणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे परिवहन विभागाने १५ एप्रिल पर्यंत या संदर्भातील सर्व प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावे असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , परिवहन विभागाच्या माध्यमातून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या नावाने महामंडळ सुरू करून या असंघटित क्षेत्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते स्वर्गीय अनंत दिघे साहेब रिक्षा व टॅक्सी चालक-मालक महामंडळाच्या माध्यमातून ६५ वर्षावरील १) श्री . बाबासाहेब कदम,२) अनंत कदम,३)लक्ष्मण गोळे,४) अरुण शिनलकर व ५) पुरुषोत्तम सहस्रबुद्धे या रिक्षा व टॅक्स चालकांचा रुपये १० हजार सन्मान निधी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच परिवहन विभागामार्फत नागरिकांसाठी दिला जाणाऱ्या फेसलेस सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

*चौकट*

*विशेष म्हणजे राज्याला दरवर्षी १५ हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतः ची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली ८५ वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. एवढंच नाही तर त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ” परिवहन भवन ” या परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी भुमिपुजन संपन्न झाले.*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments