मुंबई (प्रतिनिधी) : गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी स्वारगेट पुणे येथील बलात्कार प्रकरणी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र.१ तर्फे उग्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवसेने (उबाठा) तर्फे त्यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी सरकारकडे करण्यात आली. आंदोलनात शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या संजना घाडी, माजी आमदार विलास पोतनीस यांनी भाषणाद्वारे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांचे वाभाडे काढले. विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, माजी नगरसेवक योगेश भोईर, चेतन कदम, पांडुरंग देसाई, शरयू भोसले, अमिता सावंत, उषा कोरगावकर, हेमांगी राऊत, रोहिणी चौगुले, शर्मिला पाटील, स्नेहल पालांडे, दादाभाऊ पानमंद आदींनी आंदोलनात भाग घेतला.*
बेताल वक्तव्य केल्याबद्दल गृहराज्यमंत्र्यां विरोधात ठाकरे सेना मैदानात ; योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी
RELATED ARTICLES