कराड(प्रतिनिधी) मौजे घोगाव,तालुका कराड येथील श्री संत रोहिदास मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत रोहिदास छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे यंदाचे दहावे वर्ष होते. यावेळी समाजासाठी बहुमौल्य योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये धगधगती मुंबईचे संपादक आणि पत्रकार भीमराव धुळप यांच्यासह काही समाज बांधवांचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते अभिजित कदम,शिवसेना (उबाठा)गटाचे माहीम विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक यशवंत विचले,कराड मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक वसीम मुल्ला, समाजसेवक दयानंद पाटील,मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुळप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम मौजे घोगाव ता.कराड येथे संपन्न झाला.
श्री भीमराव धुळप यांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याची दखल घेऊन या अगोदर देखील पत्रकार धुळप यांना आजपर्यंत २१ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा स्वतःच्या गावच्या समाजाने दिलेला श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री धुळप यांनी मंडळाचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला घोगाव गावचे सरपंच,उपसरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती शंकर हरी पाटील,महादेव भेदाटे,नारायण साळुंखे,ग्रामसेवक शिवाजी जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी माजी प्राचार्य वसंत धुळप, प्रा.जालिंदर धुळप,आरोग्यसेविका सौ लीना जालिंदर धुळप,शिक्षिका नीता महेंद्र धुळप, प्रवीण धुळप,प्रदीप धुळप,दिलीप धुळप यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
चौकट
आजपर्यंत माझ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मला विविध संस्थांनी आतापर्यंत २१ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. मात्र माझ्या समाजाने श्री संत रोहिदास मित्र मंडळाने केलेला सन्मान हा बहुमूल्य असा आहे.माझ्या मातीत माझ्या जन्मगावी माझ्या समाज बांधवांनी केलेला सन्मान हा मला इतर पुरस्कारापेक्षा मोठा असल्याचे वाटते,सदर पुरस्कार मी माझी आई कै. बाळकाबाई हिंदुराव धुळप हिला समर्पित करत आहे.