प्रतिनिधी(प्रताप भणगे) : जगात भारी १९ फेब्रुवारी असा जल्लोष करत स्मित किरण स्कूलचा शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा झाला शिवराय हे अंतरमनातून आत्मसात करणे ही काळाची गरज आणि म्हणून विद्यार्थी मनावर शिवरायांच्या विचारांचा चारित्र्याचा प्रभाव असणे गरजेचे आहे हा दृष्टिकोन समोर ठेवून १ फेब्रुवारी १८ फेब्रुवारी शिवचरित्र ग्रंथाचे पारायण संपन्न झाले तसेच १९ फेब्रुवारीला उंडाळे टाळगाव घोगाव ओंड नांदगाव शेवाळवाडी शेडगेवाडी चरण ओंडोशी कोळेवाडी कुसुर या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन गीत गौरव गाण्यात आले हीच खरी महाराजांना आदरांजली होती हे सर्व शुभ आणि शिव कार्य करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी डॉक्टर सौ अंजली देसाई सौ अलका जाधव श्री महेश शेडगे श्री अमोल अंबपकर सौ वृषाली पाटील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.
स्मित किरण पब्लिक स्कूल ओंडोशी मध्ये शिवजयंती उत्सवात साजरी
RELATED ARTICLES