Monday, June 23, 2025
घरमहाराष्ट्रसमर्थ गावाची माझी वसुंधरा अभियानाने वेगळी ओळख, रोपट्याचे वाण वाटप

समर्थ गावाची माझी वसुंधरा अभियानाने वेगळी ओळख, रोपट्याचे वाण वाटप

नागठाणे(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील छोटेसे गाव म्हणजे समर्थ गाव होय .या छोट्याशा गावात मोठी कामगिरी करून दाखवण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने माझी वसुंधरा अभियान यशस्वीपणे राबवले गेले आहे. त्यामुळे समर्थ गावाची नवीन ओळख निर्माण झालेली आहे. समर्थ गावातील महिलांना रोपट्याचे वाण वाटप करून खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक मकर संक्रात साजरी केल्यामुळे अनेकांनी या ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.

सातारा जिल्ह्यात सुमारे चौदाशे ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत याचबरोबरची पर्यावरणाच्या दृष्टीने सक्षमरित्या लोक चळवळ उभी राहिलेली आहे. त्याचे अनुकरण आता सर्वच ग्रामपंचायती करत आहेत. अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश या पंचतत्वावर राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे ग्रामस्थांनी सुद्धा हातभार लावलेला आहे.
महाभारतामध्ये पाच पांडवांनी यशस्वी कामगिरी करून आपलं कौशल्य दाखवले. आज त्याच पद्धतीने समर्थ गावामध्ये सरपंच ,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी , तलाठी , आरोग्य व अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल आहे.
या सहभागामुळे खऱ्या अर्थाने प्रदूषण नियंत्रण झालेले असून आरोग्यदायी समर्थ गाव अशी नवीन ओळख झालेली आहे. या गावांमध्ये एकजुटीने व एका विचाराने ग्रामस्थ शासकीय योजना राबवत आहेत. समर्थ गावची लोकसंख्या कमी असली तरी मोठे मन ग्रामस्थांचे ग्रामपंचायत अधिकारी जयश्री साळुंखे यांना सहकार्य लाभत आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने माझी वसुंधरा अभियान यशस्वी ठरले आहे. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद , सातारा गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, यांचे मार्गदर्शन लाभत आहे.समर्थ गावात वृक्षारोपण, कुऱ्हाड बंदी, दारूबंदी, उघड्यावरील कचरा बंदी याचबरोबर ग्रामस्थांचे आरोग्य सुधारण्यासाठी गावांमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज होत आहे. त्याचे आता सर्वांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी समर्थ गावच्या माझी वसुंधरा अभियानाची ग्रामविकास अधिकारी श्रीमती साळुंखे यांच्याकडून माहिती घेऊन खऱ्या अर्थाने समर्थ गाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. त्यामुळे सर्वांचा उत्साह वाढलेला आहे.
—————————————————
फोटो समर्थ गावामध्ये रोपटेचे वाण वाटप करून सोनू साजरा (छाया- अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments