Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रवहागांवमध्ये पदवीधर महिलांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

वहागांवमध्ये पदवीधर महिलांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : मौजे वहागांव ता. कराड येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून सरपंच संग्राम पवार बाबा व सहकार्यांच्या प्रयत्नातून ६० लाख रुपये मंजूर झाले असुन शाळेचे भूमिपूजन गावातील पदवीधर महिलांच्या हस्ते घ्यायचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला व गावातील तब्बल १५० पदवीधर महिलांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
. वहागांव गांव कायमच चांगल्या कामाच्या निमित्ताने जिल्ह्यात चर्चेत असते गावामध्ये शिक्षणाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजत असुन जिल्हा परिषदेचे शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यात तृतीय क्रमांकावर आहे. शाळेचा पट गेली ३ वर्षे सातत्याने वाढत आहे त्यासाठी गावातून शाळेसाठी योगदान देण्याची वृत्ती सुद्धा वाढत आहे लोकसहभागातून शाळेचा कायापालट होत चालला आहे.
महिलांनी शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा यासाठी महिलांच्या हस्ते भूमिपूजन घेऊन निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेण्याचे क्रांतिकारी पाऊल गावाने उचलले आहे. वहागांवला गेल्या ४ वर्षात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामागिरी केल्याबद्दल स्वर्गीय आर आर पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार तसेच संत गाडगे बाबा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला असुन आदर्श गांव घडविण्याच्या दृष्टीने शाळा, आरोग्य केंद्र , वृक्षारोपण , स्वच्छता, रोजगार ,महिला बचतगट आशा विविध क्षेत्रात गावाची वाटचाल सुरु आहे
शासकीय शाळांचा दर्जा सुधारून नवीन पिढीला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळांचा कायापालट होणे गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी जिल्हा परिषद शाळेत मुलांना दाखल करावे असे आवाहन मान्यवरांच्या कडून करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सरपंच संग्राम पवार ,उपसरपंच संतोष कोळी ,सदस्य धनंजय पवार ,आनंदी पवार ,तुषार पवार रंजना पवार, शिला पवार, सुजाता पुजारी ,टॅक्स असिस्टंट विनोद पवार ,केंद्र प्रमुख साळुंखे मॅडम ,मुख्याध्यापक पवार मॅडम, शिक्षका पाटील मॅडम ,रेपाळ राऊत मॅडम, पवार मॅडम ,मास्तर ट्रेनर विद्याधर गायकवाड ,कॉन्ट्रॅक्टर अक्षय मोहिते ,राहुल वायदंडे तसेच जेष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments