प्रतिनिधी : श्री केदारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल पिंपरी (दहिसर मोरी) जिल्हा ठाणे या शाळेचा इयत्ता दहावीचा निरोप समारंभ सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी पार पडला .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्पीकर डॉ. गोरखनाथ पोळ, जीवनदीप अँड मिडिया मॅनेजर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. .आयुष्याच्या जडणघडणीत प्रवास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे उपस्थित सुयश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ,क्रीडा प्रशिक्षक निलेश भोसले, DDM न्यूज चैनल चे संपादक भीमराव धुळप तसेच संस्थेचे चेअरमन किसन जाधव,सौ ललिता जाधव मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले .
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना चेअरमन किसन जाधव यांनी शाळेचा स्थापने वेळेचा खडतर प्रवास आणि आताची शाळेची इमारत व शाळेच्या प्रगती बाबतचे अनुभव सांगितले .
संस्थेने व शिक्षकांनी आपल्यासाठी दिलेले योगदान, वेळोवेळी राबवलेले कार्यक्रम व उपक्रम इत्यादीबाबत विद्यार्थ्यांनी अनुभव सांगितले .
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता देसले मॅडम यांनी आभार मानले . यावेळी दहावीचे सर्व परीक्षेला बसणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे सर्व शिक्षक वर्ग,कर्मचारी वृंद देखील उपस्थित होता.
गुरूदीक्षा इंग्लिश हायस्कूल पिंपरी (दहिसर मोरी) ठाणे शाळेचा दहावीचा निरोप समारंभ संपन्न
RELATED ARTICLES