
प्रतिनिधी : गोरेगाव येथील कोयना नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) को ऑप हाऊसिंग सोसायटी (अ-ब) कोयना नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी गेली १९ वर्षापासून प्रयत्न करत होते. शेवटी प्रयत्न करूनही प्रकल्प मार्गी लागत नव्हता. त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असताना दोन वर्षापूर्वी लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मार्फत हा प्रकल्प मार्गी लागेल असे वाटू लागले होते.म्हणून खासदार गजानन कीर्तीकर यांनी सदर प्रश्नाबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यामध्ये येणाऱ्या त्रुटी लक्षात घेऊन सबंधित अधिकारी वर्ग यांच्याशी चर्चा करून सतत पाठपुरावा करणेसाठी विभागप्रमुख गणेश शिंदे आणि संतोष संकपाळ यांनी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी SRA अधिकाऱ्यांन सोबत चर्चा करून या प्रकल्पातील काही त्रुटि होत्या त्या त्यांनी सोडवल्या, त्या सोडवण्यासाठी करावा लागणार पाठपुरावा विभागप्रमुख गणेश शिंदे,संतोष संकपाळ यांनी अगदी प्रामाणिक पणे पूर्ण केला.

