Saturday, June 21, 2025
घरमहाराष्ट्रशिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाची राज्यस्तरीय बैठक शिवसेना बाळासाहेब भवन येथे संपन्न....

शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाची राज्यस्तरीय बैठक शिवसेना बाळासाहेब भवन येथे संपन्न. शिवसेना सचिव संजय मोरे यांची उपस्थिती

प्रतिनिधी(केतन खेडेकर) : शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना एससी एसटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय डी एन कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सदरील बैठकीचे निमंत्रक तथा मार्गदर्शक माननीय मारोती श्रीमंगले यांच्या वतीने शिवसेना बाळासाहेब भवन पक्ष, मंत्रालय जवळ कार्यालयात संपन्न झाली. त्या बैठकीचे निमंत्रक तथा मार्गदर्शक मारोती श्रीमंगले यांनी राज्यातील विविध विभाग व जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना ओबीसी बारा बलुतेदार समाजाचे सामाजिक राजकीय स्थान ओबीसी प्रवर्गातील 389 जातीचे अस्तित्व चे महत्त्व पटवून दिले. शिवसेना पक्षाचे ध्येयधोरण ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल त्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले सोबतच प्रत्येकाला 1000 सभासद नोंदणी करणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन बांधणी ही गाव तिथे शाखा घरचे ते शिवसैनिक निर्माण करण्यासाठी पदाधिकारी नव्या जोमाने नव्या दमाने कामाला सुरुवात करण्याचे आव्हान करण्यात आले. शिवसेना पक्षातील कामकाज गाववाडी वस्ती नगरात मोठ्या प्रमाणात पोहोचण्यासाठी सभासद नोंदणी प्राधान्याने करण्यात येईल. या बैठकीची प्रस्तावना रवींद्र रणदिवे गडचिरोली व मार्गदर्शन पोपट कुंभार अध्यक्ष समारोप डी एन कोळी तर आभार प्रदर्शन मनोहर पाटील यांनी केले .
या बैठकीला राज्यभरातील विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदाधिकारी आपले मनोगत व्यक्त केली. त्यामध्ये शंकरराव नांदेडकर, पोपटरावजी कुंभार, मोहन जगदाळे भगवानरावजी, श्री मंडळी कर गणेश घोसाळकर, सुरज रायसुळे, योगेश रसाळ, मच्छिंद्र शार्दुल दिगंबर वाघ, दिगंबर श्रीमंगले, निवृत्ती श्रीमंगले आदी पदाधिकारी आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments