Saturday, June 21, 2025
घरमहाराष्ट्रश्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी आयोजित हळदी - कुंकु व होम...

श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी आयोजित हळदी – कुंकु व होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न   

प्रतिनिधी : श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी यांच्या माध्यमातून या हि वर्षी रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, गोरेगाव या ठिकाणी सावरी गावामधील सासरवाशिणी व माहेरवाशीणी यांच्यासाठी हळदी – कुंकु व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम अतिशय नियोजनबद्द व खूप चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने पार पडला व सर्वजण सहकुटूंब सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार व शॉल अर्पण करून तसेच सावरी गावची ग्रामदेवता श्री. काळेश्वरी देवीच्या व गणपती बाप्पा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व नारळ आणि पान विडा अर्पण करून मुंबई मंडळाच्या कार्यकारिणी कमिटी, सल्लागार कमिटी व सावरी गावचे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले व सावरी गावच्या ५ सुवासिनी यांच्या हस्ते हि पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये दिप प्रज्वलन झाल्या नंतर कु. स्वरा प्रकाश शिंदे, कु. ऋतुजा प्रकाश शिंदे, व कु. लावण्या श्रीरंग शिंदे यांनी आपल्या मधुर गोड आवाजामध्ये स्वागत गीत सादर केले. तसेच कु. आर्या आनंद शिंदे, कु. क्रीशा केतन कदम (आपटी), कु. स्वरा रविंद्र शिंदे, कु. श्राव्या अमोल शिंदे, कु. अमृता अंकुश शिंदे यांनी सहभाग घेतला व रेकॉर्ड डांस करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाला आलेल्या सासरवाशिणी व माहेरवाशिणी त्या मधील सौ. सुलभा महेंद्र शिंदे, सौ. सावित्री दत्ताराम शिंदे, सौ. रुपाली महेंद्र शिंदे, सौ. सुवर्णा केतन कदम (आपटी) व सौ. सोनाबाई विष्णु जाधव (उंबरीवाडी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आलेल्या सर्व सासरवाशिणी व माहेरवाशिणी यांना सावरी गावच्या ५ सुवासिनी यांच्या हस्ते हळदी – कुंकु चे वाण, भेटवस्तू , तिळगुळ, तिळाचे लाडु व गुलाबाचे फुल देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला हळदी – कुंकु चे वाण, तिळगुळ, तिळाचे लाडु, गुलाबाचे फुल व जेवण व्यवस्था आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाला विजयी महिलेला मानाची पैठणी, तसेच लहान मुलांनी गायलेले स्वागत गीत व केलेले डांस यांचा सन्मान करण्यासाठी भेटवस्तू हि सर्व व्यवस्था श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. तसेच भेटवस्तू म्हणून स्टील ची प्लेट हि आपल्या मुंबई मंडळाचे सल्लागार श्री. रामचंद्र चंद्रु शिंदे यांचा सौजन्याने देण्यात आली. तसेच सकाळच्या नाष्टयाची व पाणी बॉटल ची संपूर्ण व्यवस्था, व साऊंड व्यवस्था हि मुंबई मंडळाचे सभासद श्री. संदिप कोंडीबा शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. तसेच होम मनिस्टर या कार्यक्रमामध्ये विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या महिलांना बक्षिसे देण्यासाठी आधार फाऊंडेशन, रोहोट यांच्या माध्यमातून २५ बक्षिसे देण्यात आली. तसेच श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी यांच्या कार्यकारिणी कमिटी, सल्लागार कमिटी, व मंडळाचे सभासद यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे कलाकार श्री. नयन निकम साहेब (रोहोट) यांनी ३ तास उत्तम रित्या होम मिनिस्टर हा खेळ करून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना मनभरून हसवले, व खेळवले हि तसेच सर्वानी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला व नयन निकम साहेब यांनी अप्रतिम असा होम मिनिस्टर हा कार्यक्रम सर्वांसमोर सादर केला. त्या बद्दल त्यांचे हि मनपूर्वक अभिनंदन तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या खेळा मधील खेळ पैठणीचा या अंतिम फेरीमध्ये पिठामधून तोंडाने पैशांचा कॉईन उचलने या खेळामध्ये अति तटीच्या स्पर्धेत तोंडाने पैशांचा कॉईन उचलून मागील वर्षी उपविजेत्या झालेल्या व विजयी होता होता पराजय झालेल्या सौ. निलम आनंद शिंदे यांनी या हि वर्षी पुन्हा अप्रतिम असा होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सर्व खेळाच्या संपूर्ण फेऱ्या अप्रतिम प्रकारे खेळ करून व उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी या वर्षीच्या मनाच्या पैठणीचा विजयी झाल्याचा मान मिळविला. व त्यांना खेळामध्ये काट्याची टक्कर देणाऱ्या त्यांच्याच जाऊबाई सौ. सुलभा महेंद्र शिंदे या उपविजेत्या झाल्या. व शेवटच्या फेरीमधील ३ ऱ्या नंबरला यां दोघींच्या ननंद सौ छाया संतोष कदम (आपटी) या खेळ पैठणीचा या फेरीमधून पराजय झाल्या. व या तिघींचे हि श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी यांच्या वतीने त्यांचा मान सन्माम करून अभिनंदन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व नियोजनबद्द पार पाडण्यासाठी श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी च्या सर्व कार्यकारिणी कमिटीच्या पदाधिकारी व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली. व मंडळाच्या सभासदांचे हि खूप मोलाचे सहकार्य लाभले. त्या मुळेच हा कार्यक्रम खूप छान प्रकारे आनंदात पार पडला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई मंडळाचे सदस्य श्री. आनंद कोंडीबा शिंदे (आण्णाबुवा) यांनी केले. प्रस्तावना मुंबई मंडळाचे सचिव श्री. अमोल महादेव शिंदे यांनी केले तसेच वेळे अभावी शेवटी कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मान्यवरांचे मनोगत व्यक्त करायला वेळ न मिळाल्यामुळे बक्षीस वितरण कर्यक्रम करून झाल्यावर श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी चे विद्यमान अध्यक्ष श्री. अंकुश गोविंद शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments