Monday, July 28, 2025
घरदेश आणि विदेशदेशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर भारतमातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी मा.खा. राहुल...

देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर भारतमातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी मा.खा. राहुल शेवाळे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

मुंबई : भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा, मूल्ये, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भारतमातेची डिजिटल प्रतिमा देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर बसवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याकडे केली आहे. एका विस्तृत लेखी निवेदनाद्वारे शेवाळे यांनी ही मागणी केली असून या निर्णयाची अंलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देण्याची विनंती यामध्ये करण्यात आली आहे.

माजी खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात भारतीय इतिहासातील भारतमातेच्या प्रतिमेचे महत्व विशद करताना लिहिले आहे की, भारतमाता म्हणजे जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन देशवासीयांना एकत्र आणणारी माता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना भारतमातेकडून प्रेरणा मिळाली होती. भारताचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, अध्यात्म आणि ऐक्याचे प्रतीक म्हणजे भारतमाता, असा उल्लेख शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

देशभरातील विमानतळांवर दररोज मोठ्या संख्येने भारतीय आणि विदेशी प्रवासी ये-जा करतात. विमानतळांच्या टर्मिनसवरील दर्शनी भागात भारतमातेची डिजिटल प्रतिमा उभारून जगभरात एक वेगळा संदेश जाईल, असे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रतीमेमुळे राष्ट्रीय ऐक्य आणि भारतीयांचे राष्ट्रप्रेम, भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा आणि विविधतेतील एकता अधोरेखित करता येईल. तसेच, विमानतळांच्या सौंदर्यातही भर पडेल. या कल्पनेचे सर्व भारतीयांकडून स्वागत केले जाईल, असा विश्वासही शेवाळे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments