लोणंद : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा स्वाभिमानी पक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या पक्षाचे जाळे व कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्राचे झोपडपट्टीतला पक्ष नव्हे तर राज्यभर कार्यरत असणारा पक्ष असे प्रतिपादन सातारा जिल्हाधक्ष किरण बगाडे यांनी लोणंद तालुका खंडाळा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या निवडीच्या वेळी केले.
सातारा जिल्ह्यामध्ये नवनियुक्त खंडाळा तालुक्याची कार्यकारणीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते व सातारा जिल्हा अध्यक्ष किरण बगाडे उपस्थित होते. यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या पक्षाची निर्मिती केली आहे. पक्षाचे संस्थापक आयु संजय भैय्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे. सोनवणे पक्षाच्या ध्येय आणि धोरणानुसार प्रत्येक कार्यकर्ता घडला पाहिजे व तो सामाजिक दृष्ट्या मोठा झाला पाहिजे. नुसत्या कुटुंबाचा विचार करणारे नेते नकोत. आज अखेर फक्त नेत्यांनी कार्यकर्त्यांचे वाटोळे केले व स्वतः मोठे झाले आहेत . असे कुणाचे नाव न घेता त्यांनी टीका केली.
आतापर्यंत विविध प्रश्नांची जाण नसतानाही आंदोलन, मोर्चे करून तांत्रिक दबाव तंत्र वापरले .स्वतःचा फायदा करून कार्यकर्त्यांना फक्त झेंडे वागवण्याचेच काम दिले. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा झोपडपट्टीतला नसून हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. या पक्षाच्या माध्यमातून शोषित पीडित यांना न्याय देण्याचे काम केले जाते. लवकरच खंडाळा तालुक्याचे संपूर्ण कार्यकारणी जाहीर करणार असून येणाऱ्या काळामध्ये भव्य अशा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन खंडाळा या ठिकाणी करणार असल्याचे बबलू वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सविता सपकाळ यांची व बबलू वाघमारे यांची खंडाळा तालुका अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी अरुण कोळेकर अर्चना शिंदे संघटक अनिता शेलार महिला आघाडी खंडाळा तालुकाध्यक्ष बेबी क्षीरसागर महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष निवड करण्यात आली.
यावेळी अनेक पदाधिकारी यांचं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षांमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर वेगवेगळ्या पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष किरण बगाडे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते ,सातारा जिल्हा संघटक विकास जाधव ,जावली तालुका उपाध्यक्ष सयाजी भिसे ,आकाशभाई गायकवाड ,युवक अध्यक्ष वाई तालुका लक्ष्मण खुडे, राहुल माने, प्रतिभा जाधव, लता खुंटे चैताली खुंटे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अरुण कोळेकर यांनी आभार मानले.
_________________________________
फोटो कॅप्शन खंडाळा तालुक्यातील महाराष्ट्र इथून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना जिल्हाध्यक्ष किरण बगाडे (छाया- रमेश गायकवाड, लोणंद)