सातारा(अजित जगताप) : सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपल्या पदाचा वापर करणारा नेता म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय. अति दुर्गम व मागासलेल्या जावळी महाबळेश्वर खोऱ्यात हिरे रत्न निर्माण झाले आहेत. त्यातील एक हिरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यात भव्य आरोग्य शिबिर व विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. देशाच्या राजकारणामध्ये चमकणारे शिंदे पिता पुत्र म्हणजे सातारची अस्मिता ठरली आहे. अशा शब्दांमध्ये आज सर्वांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन गौरव केला आहे.
सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झाली असून अत्याधुनिक यंत्रणा व उपचाराच्या पद्धती यामुळे सामान्य माणसांना उपचार करणे खर्चिक बाब झालेली आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता सुरू करण्यात आली. माणसाचे आरोग्य चांगले असेल तरच माणूस संघर्ष करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिंदे पिता पुत्र प्रामाणिकपणाने सेवा करत आहेत. त्यांचा आदर्श सर्वच शिवसैनिक घेत आहेत अशा शब्दात शिवसेना सातारा जिल्हा उपजिल्हाप्रमुख संदीप दादा पवार यांनी काढले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली.
सातारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लिंब या ठिकाणी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, तालुकाप्रमुख रोहित कटके व महायुतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या लिंब गावामध्ये आरोग्य सुविधा निर्माण करावी. यासाठी जावळीचे सुपुत्र व माजी आमदार जी. जी. कदम यांच्या प्रयत्नातून आरोग्य केंद्राची उभारणी केली होती. लिंब परिसरातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी वृंद प्रामाणिकपणाने सेवा करत आहेत. त्यांच्या भाग्य असे आहे की, त्यांना मानवी सेवा करण्याचा मनस्वी आनंद व वेतन सुद्धा मिळते. हे फक्त आरोग्य विभागातीलच कर्मचाऱ्यांच्या नशीब आहे. त्यांनीही आपले आरोग्य जपून जास्तीत जास्त मानवी सेवा करावी. असाही सल्ला देण्यात आला.
या वेळेला लिंब विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील व परिसरातील शिवसैनिक ,ग्रामस्थ आणि सहकार क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. महाशिबिरामध्ये सुमारे ५०० ग्रामस्थांनी आरोग्याची तपासणी करून वेळेत दक्षता घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
चौकट- सातारा शहरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले या वेळेला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.