Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रमौजे घोगाव तालुका कराड येथे संत रोहिदास मित्र मंडळातर्फे २६ फेब्रुवारी रोजी...

मौजे घोगाव तालुका कराड येथे संत रोहिदास मित्र मंडळातर्फे २६ फेब्रुवारी रोजी संयुक्त जयंती महोत्सव

प्रतिनिधी : मौजे घोगाव तालुका कराड जिल्हा सातारा येथील श्री संत रोहिदास मित्र मंडळ यांच्या वतीने सालाबादपमाणे यावर्षी देखील श्री संत रोहिदास महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही संयुक्त जयंती महोत्सव बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता घोगाव ता. कराड येथे साजरी करण्यात येणार आहे. मंडळाचे यंदाचे १० वे वर्ष असून या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, जिल्हा पंचायत सदस्य ऍड. उदय दादा पाटील, गटविकास अधिकारी पलूस अरविंद माने, उपजिल्हाधिकारी ठाणे वैशाली माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर कराड दक्षिण कराड उत्तर मधील सर्व चर्मकार समाज मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमणे असेल.

बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, त्यानंतर गावातील मुख्य ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर उद्घाटन होईल.
सकाळी ११ वाजता आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व समाजातर्फे एका प्रतिष्ठित व्यक्तीचा म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके खंडागळे गुरुजी यांचा सन्मान,
दुपारी ४ वाजता महिलांसाठी विशेष हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वाजता समाजातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या कार्यक्रमाला सर्व आसपासच्या परिसरातील व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष गोविंद धुळप तसेच सर्व कमिटी आणि धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भीमराव धुळप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments