प्रतिनिधी(रमेश औताडे) : महिला आरक्षणाचा मुद्दा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून चर्चेत आहे. सर्वांत आधी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण मिळालं. त्यानंतर, आता हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचला आहे. या लढ्याचे व्यापक स्वरुप म्हणजे राजकीय क्षेत्रात सुद्धा स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये ५०%आरक्षण मिळाले हि बाब स्वागतार्ह असून महिलांच्या सन्मानाची ही खरी सुरवात आहे. पण हेच प्रमाण विधानसभा व लोकसभा या ठिकाणी का नाही असा सवाल ॲड पुजा प्रकाश एन यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
लोकसभेमध्ये १४ महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे परंतु सर्वसाधारण महिलांना प्रतिनिधित्व मिळाले नसून वारसा महिलांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. राज्यसभा ,लोकसभा ,मंत्रिमंडळात महिलांना ४८ टक्के महिलांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी मागणी ॲड पुजा प्रकाश एन यांनी यावेळी केली.
आज देशांमध्ये ४८ टक्के महिला आहेत त्यांना उमेदवारी का दिली नाही ? हा आमच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे राजकीय मुद्दा नाही. राजकीय व्यवस्थेमध्ये स्थान मिळवण्याकरीता महिलांना खुप मोठा संघर्ष करावा लागला आहे. मोठा लढा उभारावा लागला आहे. या लढ्याचे फलीत म्हणजे महिलांना ३३%आरक्षण प्राप्त झाले व पुढे महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. जनगणना, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना ही सारी प्रक्रिया पार पडल्यावरच महिला आरक्षण प्रत्यक्षात अमलात येईल असे ॲड पुजा प्रकाश एन यांनी सांगितले.
आज जवळपास प्रत्येक प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांनी ७० ते ८०% उमेद्वारी घोषित केली पण त्यामध्ये महिलांचे प्रमाण किती? नारी शक्ति वंदन विधेयक २००९ ला राज्यसभेत मंजूर होउन २०२४ ला लोकसभेत बहुमताने मंजूर होउन उपयोग काय? सर्वचं राजकीय पक्षांनी विधेयक बाजूने मतदान करुन देखील १८ व्या लोकसभेचा कार्यकाल करीता निवडणुक लागु होऊन जवळपास सर्वचं पक्षांनी महिलांना उम्मेदवारी देण्यामध्ये उदासिनता दिसून येते.
प्रत्येक लोकसभा मतदार संघात महिला आरक्षण विधेयक लक्षवेध रॅली काढुन महिलांमध्ये जागृति करण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे जे उम्मेदवार येणाऱ्या काळात महिला आरक्षण विधेयक तथा नारी शक्ति वंदन विधेयक तत्काल लागु व्हावे करीता लीखीत वचननामा देतील अशाचं उम्मेदवार यांना महिलांनी मतदान करावे अन्यथा नोटाचा वापर करावा. अशी मागणी करणार आहोत असे ॲड पुजा प्रकाश एन यांनी सांगितले.
सत्याग्रह फोरम, मुंबई तर्फे ॲड पुजा प्रकाश एन, रेणिता सुवर्णा मुंबई प्रदेश संयोजक, उषा गुप्ता, संघटक शितल राजपूत, रजनी तोंडवलकर, ॲड स्मिता जोंधळे, केन्द्रीय संघटक ऐलान बर्मावाला,भारत सोनार मुंबई प्रदेश संघटक बाळकृष्ण मुगदल, मुंबई जिल्हा संघटक सुदाम गवळी ,अतुल तिभुवन नितीनसिंग राजपूत तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते.