प्रतिनिधी(रमेश औताडे) : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तिकर हे निवडणूक रिंगणात असून,त्यांच्या विरोधात सर्वसामन्य जनतेचे प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ऍड.सुनील चव्हाण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत.अशी माहिती त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली.
दिंडोशी,गोरेगाव, जोगेश्वरी, वर्सवा, अंधेरी (पूर्व) व अंधेरी ( पश्चिम)या सहा विधानसभा मतदार संघाचा समूह असलेल्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ऍड.सुनील चव्हाण खासदारकीसाठी निवडणूकीच्या रिगणात आहे. महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्य कुटुंब त्रस्त आहे,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, कर्जामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नाही, गोरगरीब कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, रुग्णालयात सोवी-सुविधा उपलब्ध नाहीत, पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे.
प्राथमिक सुविधा पुरविल्या जात नाहीत, या प्रस्थांवर आपल्या सरकारने गेल्या ७० वर्षात कोणतेही प्रभावी धोरण बनवले नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता आजही प्रगतीचा मुख्यप्रवाह पासून वंचित आहे.असा आरोप
ऍड चव्हाण यांनी करीत नागरिकांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळावा म्हणून मी निवडणूक लढवित आहे,असे ते म्हणाले.
.
