पुणे प्रतिनिधी : किफायतशीर दरामध्ये सर्वसामान्यांना शहरामध्ये घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा कडून विविध विभागांमध्ये घरांची सोडत जाहीर केली जाते. पुण्यात सध्या ४७७७ घरांसाठी लॉटरी प्रतिक्षेमध्ये आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर मध्ये ही घरं उपलब्ध असून त्यासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता ग्राहकांना सोडतीची प्रतिक्षा आहे. म्हाडाच्या पुणे विभागाची सोडत ८ मे २०२४ दिवशी होणार आहे. housing.mhada.gov.in वर त्याचे अपडेट्स मिळतील.
म्हाडा पुणे लॉटरी २०२४ साठी अर्ज ८ मार्च २०२४ रोजी सुरू झाले होते आणि ते १ एप्रिल २०२४ पर्यंत स्वीकारले गेले. म्हाडा पुणे लॉटरी २०२४ चा लकी ड्रॉ ८ मे २०२४ रोजी काढला जणार आहे. म्हाडा पुणे लॉटरी २०२४ साठी रिफंड १७ मे २०२४ पासून दिला जाणार आहे. दरम्यान लॉटरीचा निकाल ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणार आहे.
म्हाडा मध्ये पुणे विभागात २४१६ घरं ही प्रथम येणार्यास प्राधान्य तत्त्वावर दिली जाणार आहेत. तर अन्य विविध स्कीम मध्ये १८ घरं आहेत. प्रधानमंत्री आवास योजना मध्ये ५९ आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) PPP मध्ये ९७८ घरं उपलब्ध आहेत. २०% scheme मध्ये पीएमसी ची ७४५ आणि पिंपरी चिंचवड ची ५६१ घरं उपलब्ध आहेत.
housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईट भाग्यवान विजेत्यांची नावं तसेच प्रतिक्षा यादी देखील प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे ८ मे दिवशी याच संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध केला जाईल. म्हाडाच्या घरांच्या निकालामध्ये युट्युबवर देखील निकाल दाखवला जातो. https://housing.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन Draw Result चा पर्याय निवडून तुमचा अॅप्लिकेशन नंबर टाका. निकालाच्या दिवशी तुमचं स्टेटस पहायला मिळेल. तर ऑफलाईन स्वरूपात ८ मे दिवशी सकाळी १० वाजता गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे इथे प्रत्यक्ष पाहता येणार आहे.