Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रआईच्या स्मरणार्थ साताऱ्यातील सुपुत्र दीपक भुजबळ यांचे ५६ वे रक्तदान..

आईच्या स्मरणार्थ साताऱ्यातील सुपुत्र दीपक भुजबळ यांचे ५६ वे रक्तदान..

सातारा(अजित जगताप) : राजा तिन्ही जगाचा…. आईविना भिकारी… याचे सर्वांनाच नेहमी स्मरण होते. कारण आई या शब्दांमध्ये ईश्वराचे सामर्थ्य लपलेले आहे. आई नावाचा ईश्वर निघून गेल्यानंतर गररुपी मंदिरातील गाभारा रिकामा होतो. परंतु आईच्या स्मरणार्थ साताऱ्यातील शिक्षक सुपुत्र दीपक भुजबळ यांनी सलग सातव्या पुण्यतिथीनिमित्त 56 वे रक्तदान करून आपल्या आईच्या स्मरणार्थ एक वेगळा संदेश दिला आहे.
कोंडवे तालुका सातारा येथील शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या भुजबळ कुटुंबीयांनी अनेकदा सामाजिक उपक्रमांमध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. दीपक भुजबळ यांची आई कैलास वासी सौ जयश्री शंकरराव भुजबळ यांचे सात वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. संपूर्ण भुजबळ कुटुंबियांसह कोंडवे गावावर शोक काळा पसरली होती. आपल्या आईची आठवण कायमस्वरूपी जतन करावी यासाठी त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबवले. एवढेच नव्हे तर आईच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अंधश्रद्धेला फाटा देऊन त्यांनी रक्तदान करून दुसऱ्याला जीवदान देण्याची विधायक उपक्रम राबवले आहेत.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात स्वतः दीपक भुजबळ व त्यांची पत्नी कांचन दीपक भुजबळ यांनी आईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज रक्तदान केले. सातारा जिल्हा चिकित्सक डॉक्टर युवराज सुधाकर करपे यांच्या हस्ते रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन श्री भुजबळ कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.
सातारा जिल्हा परिषदेच्या खटाव तालुक्यातील आदर्श गाव निढळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावर श्री दीपक भुजबळ हे कार्यरत आहेत. त्यांचे वडील शंकरराव भुजबळ हे सेवानिवृत्त असून सुद्धा सामाजिक व विधायक उपक्रमात नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद् व शिक्षण अधिकारी प्राथमिक (शबनम मुजावर) यांच्यासह सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सहभागी होणारे रयत शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार विजय दत्तात्रेय मांडके ,अजित जगताप, डॉक्टर प्रल्हाद इंजे ,यांच्यासह मान्यवरांनी कौतुक करून श्रीमती जयश्री भुजबळ यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

—– — _________________________
फोटो आपल्या आईच्या स्मरणार्थ रक्तदान करताना शिक्षक दीपक भुजबळ (छाया- निनाद जगताप ,निढळ)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments